Rules to change from 1st July:Also Read - Educational loan : SBI ची खास योजना! 10 वीनंतर पुढच्या शिक्षणासाठी मिळणार दीड कोटींपर्यंतचे शैक्षणिक कर्ज

नवी दिल्ली: देशातील ‘कोविड-19’च्या (Covid-19) महामारीमुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे (Lockdown in India)अनेक उद्योगधंदे ठप्प झाले आहेत. परिणामी अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यामुळे बहुतांश नागरिकांची आर्थिक घडी पार विस्कटून गेली आहे. हातावर पोट असणाऱ्यांवर तर उपासमारीची वेळ आली आहे. आता तर देशात महागाईचा विस्फोट झाला आहे. पेट्रोल-डिझेलसोबतच (Petrol-Disel Rate hike) खाद्यतेलाचा (Price Of Edible Oil) भडका उडाला आहे. त्यामुळे तर सर्वसामान्य लोक आणखी मेटाकुटीला आले आहेत. त्यात 1 जुलैपासून आर्थिक व्यवहाराशी संबंधीत आणखी काही नियम बदलणार आहेत. (Rules to change from 1st July) त्याचा थेट परिणाम आम आदमी म्हणजेच सर्वसामान्य जनतेच्या जीवनावर होणार आहे. Also Read - LPG Cylinder Latest Price: खूशखबर! गॅस सिलिंडर 135 रुपयांनी झाला स्वस्त, एका क्लिकवर जाणून घ्या तुमच्या शहरातील दर...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातील केंद्र सरकार प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला काही बदल करत आहे. येत्या 1 जुलैला देखील आम आदमीशी संबंधीत नियमांमध्ये बदल होणार आहे. त्याचा थेट परिणाम जाणवणार आहे. त्यामुळे घराचं आर्थिक बजेट कोलमडण्याची शक्यता आहे. Also Read - SBI Recruitment 2022 : सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना SBI मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी, 641 पदांसाठी होणार भरती!

महिन्याच्या पहिल्या तारखेला घरगुती गॅस सिलिंडरचा (LPG Cylinder) दर निर्धारित केला जातो. याशिवाय एसबीआयमधून (SBI) पैसे काढणं महागणार आहे. (Money Withdrowal) चेक (Cheque) आणि एटीएममधून (ATM) पैसे काढण्याच्या नियमांत बदल होणार आहे.

कोणते नियम बदलणार…?

– 1 जुलै 2021 पासून एलपीजी सिलिंडरचा नवा दर निर्धारित करण्यात येणार आहे. गॅस सिलिंडरचे दर वाढण्याची शक्यता आहे.

– देशातील सर्वात मोठी बँक अर्थात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमांमध्ये बदल करण्यात येणार आहे. नवे नियम येत्या 1 जुलैपासून लागू होणार आहे. स्टेट बँकेच्या बचत खातेधारकांना बँक किंवा एटीएम विड्रॉलसाठी केवळ 4 ट्रांजेक्शन विनामुल्य असतील. त्यानंतरच्या प्रत्येक ट्रांजेक्शनसाठी 15 रुपये आणि जीएसटी शुल्क आकारण्यात येणार आहे.

बँक आणि बचत खातेधारकाला 10 पानांचं चेक बुक मोफत देत होती. आता मात्र खातेधारकाला शुक्ल मोजावं लागणार आहे. बँक चेक बुकसाठी 40 रुपये आणि जीएसटी शुल्क आकारणार आहे. तर 25 पानांच्या चेक बुकसाठी खातेधारकाला 75 रुपये आणि जीएसटी शुल्क द्यावे लागणार आहे. एमर्जेंसीत चेक बुक घेण्यासाठी खातेधारकाला 50 रुपये अतिरिक्त द्यावे लागतील. ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या नियमात कोणताही बदल करण्यात येणार नाही. तर बचत खातेधारकांना होम ब्रॅंचमधून पैसे काढण्यावर कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येणार नसल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

– इनकम टॅक्स रिटर्न फाईल केला नसेल तर त्याची अंतिम मुदत 30 जून आहे. अन्यथा तुमच्याकडून 1 जुलैपासून दुप्पट टीडीएस वसूल करण्यात येईल.

– कॅनरा बॅंकेत मर्ज झालेल्या सिंडिकेट बॅंकच्या आयएफएससी (IFSC) कोडमध्ये बदल करण्यात येणार आहे. सिंडिकेट बँकेच्या सर्व ग्राहकांना कोड बदल्याबाबत आवाहन करण्यात आलं आहे. 30 जूनपर्यंत याची मुदत आहे. अन्यथा 1 जुलैपासून आरटीजीएस (RTGS) आणि एनइएफटी (NEFT)सारख्या सुविधा मिळू शकणार नाही.