Russia Ukraine Crisis: भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन पाचवे विमान मायदेशात दाखल, आता Indigo ची उड्डाणेही चालणार
Russia Ukraine Crisis: रशियासोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान युक्रेनमध्ये अडकलेल्या 249 भारतीयांना घेऊन ऑपरेशन गंगा अंतर्गत बुखारेस्टहून पाचवे विमान सोमवारी सकाळी दिल्ली विमानतळावर दाखल झाले.

Russia Ukraine Crisis: रशियासोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान युक्रेनमध्ये (Russia Ukraine War) अडकलेल्या 249 भारतीयांना घेऊन ऑपरेशन गंगा (Operation Ganga) अंतर्गत बुखारेस्टहून (Bucharest) पाचवे विमान सोमवारी सकाळी दिल्ली विमानतळावर (Delhi Airport) दाखल झाले. यावेळी विमानतळावर पतिक्षेत असलेल्या अधिकारी व नातेवाईकांनी त्यांचे स्वागत केले. दिल्लीत पोहोचलेल्या विद्यार्थ्यांसाठी विविध राज्यांत पोहोचण्याची व्यवस्थाही करण्यात आली होती.आतापर्यंत 2 हजारांहून अधिक लोकांना युक्रेनमधून भारतात परत आणण्यात आले आहेत. यामध्ये बहुतांश विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
Also Read:
- IndiGo Flight Engine Fire: इंडिगो विमानाच्या इंजिनला आग, दिल्ली एअरपोर्टवर इमर्जन्सी लँडिंग; 184 प्रवासी थोडक्यात बचावले!
- Russia Ukraine War: रशिया-युक्रेन युद्धात 'डर्टी बॉम्ब'ची भीती, जाणून घ्या किती घातक आहे हा बॉम्ब
- Russia Ukraine War: भारतीयांनी तातडीने युक्रेन सोडावे, भारतीय दुतावासाने पुन्हा दिल्या सूचना!
यूक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी ‘ऑपरेशन गंगा’ नावाचे ऑपरेशन पोलंड, रोमानिया, हंगेरी आणि स्लोव्हाकियामधून मोठ्या प्रमाणावर सक्रिय केले जात आहे. या देशांमध्ये युक्रेनच्या सीमेवर छावण्या उभारण्यात आल्या आहेत. अजूनही 15 हजारांहून अधिक लोक तेथे अडकले असल्याचे एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे.
पंतप्रधान मोदींनी घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी संध्याकाळी युक्रेनमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्याच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक घेतली. बैठकीत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला आदी उपस्थित होते. सूत्रांनुसार, मोदींनी युक्रेनमधून विद्यार्थ्यांसह भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचा आढावा घेतला. यावेळी 1,000 हून अधिक विद्यार्थी वेगवेगळ्या फ्लाइटने परतले असल्याची माहिती पंतप्रधानांना देण्यात आली आहे.
इंडिगो बुडापेस्ट, बुखारेस्ट येथून उड्डाणे चालवणार
युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणल्यानंतर देशातील सर्वात मोठी एअरलाइन इंडिगो बुडापेस्ट आणि बुखारेस्ट येथून उड्डाणे चालवणार आहे. एअरलाइन्सच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार सध्या कंपनीने बुडापेस्ट (हंगेरी) आणि बुखारेस्ट (रोमानिया) येथून प्रत्येकी एक फ्लाइट चालवण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही उड्डाणे इस्तंबूल मार्गे चालतील.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या