Russia-Ukraine Crisis: रशिया-युक्रेनमध्ये युद्ध झाल्यास भारतीय अर्थव्यवस्थेवर कसा होऊ शकतो परिणाम?

Russia-Ukraine Crisis: रशियाने युक्रेनवर आक्रमण केले आणि अमेरिका आणि त्याच्या इतर नाटो सहकाऱ्यांमध्ये मोठा संघर्ष झाला तर अमेरिका आणि इतर प्रगत देश रशियावर आर्थिक निर्बंध लादतील अशी अपेक्षा आहे. बर्‍याचदा हे निर्बंध आक्रमकांसोबत व्यवसाय करणाऱ्या देशांनाही लागू होतात.

Updated: February 23, 2022 10:00 AM IST

By India.com News Desk | Edited by Chandrakant Jagtap

Russia-Ukraine Crisis: रशिया-युक्रेनमध्ये युद्ध झाल्यास भारतीय अर्थव्यवस्थेवर कसा होऊ शकतो परिणाम?
Russia-Ukraine Crisis

Russia-Ukraine Crisis: रशिया-युक्रेन तणाव वाढल्याने संघर्ष थांबविण्याचा प्रयत्न करण्यासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने (United Nations Security Council) मंगळवारी तातडीची बैठक बोलावली. वृत्तसंस्था असोसिएटेड प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, जागतिक शांतता संस्थेच्या (World Peace Council) राजकीय प्रमुखांनी पूर्व युक्रेनमधील डोनेस्तक (Donetsk) आणि लुहान्स्क (Luhansk) या फुटीरतावादी प्रदेशांना रशियाने मान्यता दिल्याचा निषेध केला आहे.

Also Read:

एएफपी वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, यूएनमधील (UN) अमेरिकेच्या प्रतिनिधीने दोन प्रदेशांना मान्यता दिल्याबद्दल रशियाला लक्ष्य केले आणि पुतिन (Vladimir Putin) यांचे दावा फोल ठरवत, आपला देश डोनेस्तक आणि लुहान्स्कमध्ये शांततारक्षकांची भूमिका बजावेल असे त्यांनी सांगितले. दरम्यान या घटनेनंतर अमेरिका (America) आणि रशिया यांच्यातील चर्चेत प्रगती न झाल्याने जगभरातील शेअर बाजारात जोरदार घसरण झाली. तसेच या अनिश्चिततेमुळे कच्च्या तेलाच्या किमतीतही (Crude oil prices) मोठी वाढ नोंदवण्यात येत आहेत.

वाढू शकते महागाई

काळ्या समुद्राच्या प्रदेशातून अन्नधान्याच्या प्रवाहात कोणताही व्यत्यय आल्यास त्याचा किमतींवर आणि पुढे चालून अन्नधान्याच्या महागाईवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. चार प्रमुख निर्यातदार – युक्रेन, रशिया, कझाकस्तान आणि रोमानिया हे काळ्या समुद्रातील बंदरांमधून धान्य पाठवतात. मात्र युद्धजन्य परिस्थितीत यामध्ये कोणत्याही लष्करी कारवाई किंवा निर्बंधांमुळे व्यत्यय येऊ शकतो.

नैसर्गिक वायू आणि तेलाच्या किमती वाढतील

युक्रेन आणि रशियामधील तणावाचे रुपांतर संघर्षात झाले तर ऊर्जा बाजारावर परिणाम होण्याची शक्यता आहे. युरोप आपल्या 35% नैसर्गिक वायूसाठी रशियावर अवलंबून आहे. हा वायू मुख्यतः जर्मनीमधून बेलारूस आणि पोलंड ओलांडून पाइपलाइनद्वारे युरोपात येतो.

97 डॉलरवर पोहेचले कच्चे तेल

या वर्षीच्या आर्थिक सर्वेक्षणात 2022-23 या आर्थिक वर्षात कच्च्या पेट्रोलियमच्या किमती प्रति बॅरल 70-75 डॉलरच्या श्रेणीत असण्याची अपेक्षा आहे. क्रूडच्या किमती गेल्या एका आठवड्यापेक्षा जास्त काळापासून प्रति बॅरल 90 डॉलरच्या वर सुरू आहेत. यामागील प्रमुख कारण युक्रेन आणि रशिया यांच्यातील तणाव हे आहे. कच्च्या तेलाच्या किमती आज सात वर्षांतील उच्चांकी म्हणजेच 97 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचल्या आहेत.

संघर्षाचे व्यापारावर परिणाम

रशियाने युक्रेनवर आक्रमण केले आणि अमेरिका आणि त्याच्या इतर नाटो सहकाऱ्यांमध्ये मोठा संघर्ष झाला तर अमेरिका आणि इतर प्रगत देश रशियावर आर्थिक निर्बंध लादतील अशी अपेक्षा आहे. बर्‍याचदा हे निर्बंध आक्रमकांसोबत व्यवसाय करणाऱ्या देशांनाही लागू होतात.

आंतरराष्ट्रीय व्यापारावर होईल परिणाम?

सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE) डेटाबेसमधील डेटातून लक्षात येते की भारतासोबत व्यापारामुळे रशियाचे महत्त्व कमी होत आहे. सोव्हिएत युनियनच्या पतनापूर्वी रशिया हे भारतासाठी एक महत्त्वाचे निर्यातीचे ठिकाण होते आणि भारताच्या एकूण निर्यातीत सुमारे याचा 10 टक्के भाग होता. 2020-21 पर्यंत ही संख्या 1% पेक्षा कमी झाली आहे. या काळात भारताचा एकूण व्यापार नक्कीच वाढला आहे. 2020-21 मध्ये भारताच्या एकूण आयातीमध्ये रशियन आयातीचा वाटा 1.4% होता.

भारताच्या संरक्षण गरजांवर होणार परिणाम

रशियन निर्यातीवरील निर्बंध भारताच्या संरक्षण गरजांसाठी समस्या निर्माण करू शकतात. स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटच्या (SIPRI) मार्च 2021 च्या फॅक्टशीटनुसार 2016-2020 मध्ये रशिया हा दुसरा सर्वात मोठा जागतिक शस्त्रास्त्र निर्यातक होता आणि भारत हे त्याचे सर्वात मोठे निर्यात गंतव्यस्थान होते, जे रशियन संरक्षण निर्यातीपैकी 23% होते.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: February 23, 2022 9:53 AM IST

Updated Date: February 23, 2022 10:00 AM IST