Russia-Ukraine War: रशियाचे युक्रेनविरोधात युद्ध सुरू, पुतीन यांचे लष्करी कारवाईचे आदेश
रशिया आणि युक्रेनमध्ये आरपारची (Russia Ukraine Conflict) लढाई सुरू झाली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Russian President Vladimir Putin) यांनी यूक्रेनविरोधात युद्धाची घोषणा केली आहे.

Russia-Ukraine War: रशिया आणि युक्रेनमध्ये आरपारची (Russia Ukraine Conflict) लढाई सुरू झाली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Russian President Vladimir Putin) यांनी यूक्रेनविरोधात युद्धाची घोषणा केली आहे. युक्रेनवर लष्करी कारवाई करा, असे फर्मान देखील रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी सोडले आहेत. ‘डोनबासमध्ये ‘स्पेशल ऑपरेशन’ राबवावे, असे निर्देश राष्ट्रध्याक्ष पुतीन यांचे रशियन सैन्याला दिले आहेत. युक्रेनला सहकार्य केल्यास नाटोला गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी देखील पुतीन यांनी दिली आहे.
Also Read:
काय म्हणाले रशियन राष्ट्राध्यक्ष..?
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन म्हणाले, रशियाने युक्रेनविरोधात युद्ध सुरू केले आहे. डॉनबास प्रांतात ‘स्पेशल ऑपरेशन’ राबवले जात आहे. ‘युक्रेन सैन्यानं शस्त्रं खाली टाकावे, युक्रेन सैन्याने शरण यावे, असे आवाहन देखील करण्यात आले आहे. यूक्रेनवर पूर्णपणे ताबा मिळवण्याचा आमचा इरादा नसल्याचे देखील पुतीन यांनी स्पष्ट केले आहे. दुसरीकडे, संयुक्त राष्ट्राने (UN) पुतीन यांना युद्ध थांबवण्याचे आवाहन केले आहे.
युक्रेनमधील 4 शहरांवर क्षेपणास्त्र डागले
रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी युद्धाची घोषणा करतातच युक्रेनची राजधानी कीववर बॉम्बहल्ले करण्यात आले आहे. युक्रेनमधील 4 शहरांवर क्षेपणास्त्र डागले आहेत. युक्रेन आणि राजधानी कीवमधील बंडखोरांच्या ताब्यातील चार शहरांवर क्षेपणास्त हल्ले करण्यात आले आहे.
ANI च्या वृत्तानुसार, क्रमाटोस्कमध्ये 2 स्फोट करण्यात आले आहेत. रशियन सैनिक क्रिमियामार्गे युक्रेनमध्ये प्रवेश करत आहेत. दोन लाखांहून अधिक रशियन सैनिक सीमेवर तैनात आहेत. पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक भागात स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून तणाव सुरू आहे. याबाबत युरोपसह पाश्चात्य देशांनी दोन्ही देशांना चर्चा करुन तोडगा काढण्यास सांगितले होते. मात्र, रशियाने युक्रेनमधील दोन प्रदेशांना स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिली. युक्रेनचे दोन तुकडे पाडले. त्यानंतर अमेरिका आणि युरोपसह इतर देशांनी रशियावर अनेक निर्बंध लादले आहेत. तरीही रशियाने माघार न घेता युद्धाची घोषणा केली आहे.
संयुक्त राष्ट्राचे युद्ध थांबवण्याचे आवाहन…
रशिया आणि युक्रेनला संयुक्त राष्ट्राने शांततेचे आवाहन केले आहे. युद्ध थांबवण्यास सांगितले आहे. फ्रान्सने बुधवारी आपल्या नागरिकांना युक्रेन सोडण्याच्या सूचना दिल्या आहेत. युद्धाच्या धोक्यात विलंब न करता लवकरात लवकर युक्रेन सोडावे, असे म्हटले आहे. फ्रान्सच्या परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत एक निवेदन जारी केले आहे.
युक्रेनमध्ये आणीबाणी जाहीर
दरम्यान, रशियाचे राष्ट्राध्यक्षांनी युक्रेनच्या सीमेवर रशियन सैन्य तैनात केल्याने युक्रेनने (Ukraine) बुधवारी देशव्यापी आणीबाणी घोषित केली आहे. गुरुवारपासून पुढील 30 दिवस आणीबाणी लागू राहिल, अशी माहिती युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वलोदिमिर जेलेन्स्की यांनी दिली आहे. पाश्चात्य देशांनी रशियाविरुद्ध अनेक निर्बंधांची घोषणा केली. मॉस्कोने युक्रेनमधील आपल्या दूतावासाचा परिसर रिकामा केला आणि राजनैतिक कर्मचाऱ्यांना बाहेर काढले.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या