Top Recommended Stories

Russia-Ukraine War: युक्रेनमधून मायदेशी परतणाऱ्यांसाठी गाइडलाइन्स जारी, एअर इंडियाचे विमान संध्याकाळी मुंबईत पोहचणार!

Russia-Ukraine War: युक्रेनमध्ये 20 हजार भारतीय विद्यार्थी अडकले आहेत. या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी एअर इंडियाचे विमान- AI-1943 बुखारेस्टला पोहचले आहे. हे विमान जवळपास 470 विद्यार्थ्यांना घेऊन आज संध्याकाळी साडेसातच्या सुमारास मुंबई एअरपोर्टवर दाखल होणार आहे.

Updated: February 26, 2022 5:46 PM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

Operation Ganga: Full List Of Flights Bringing Indians From Ukraine; Departure, Arrival Details Here
Image for representational purposes

Russia-Ukraine War : रशियाने लष्करी हल्ला (Russia-Ukraine War) केल्यामुळे युक्रेन देश सध्या संकटातात आहे. युक्रेनमध्ये (Ukraine) युद्धामुळे परिस्थिती बिकट होत चालली आहे. अशामध्ये युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना परत मायदेशी आणण्यासाठी मोदी सरकारकडून (Modi Government) जोरदार प्रयत्न सुरु आहेत. युक्रेनमध्ये 20 हजार भारतीय विद्यार्थी अडकले आहेत. या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी एअर इंडियाचे विमान- AI-1943 (Air India) बुखारेस्टला पोहचले आहे. हे विमान जवळपास 470 विद्यार्थ्यांना घेऊन आज संध्याकाळी साडेसातच्या सुमारास मुंबई एअरपोर्टवर (Mumbai Airport) दाखल होणार आहे. युक्रेनमधून भारतात येणाऱ्यांसाठी सरकारकडून नवीन गाइडलाइन्स जारी करण्यात आल्या आहेत.

Also Read:

नवीन गाइडलाइन्सनुसार, युक्रेनमधून मुंबईमध्ये दाखल झाल्यानंतर या विद्यार्थ्यांना आपले कोव्हीड लस घेतल्याचे सर्टिफिकेट (Corona Vaccine Certificate) दाखवावे लागणार आहे. जर एखाद्या विद्यार्थ्याकडे कोरोना लस (Corona Vaccine) घेतल्याचे सर्टिफिकेट नसेल तर तो विद्यार्थी आरटी-पीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट (RTPCR Report) देखील दाखवू शकतात. या दोघांपैकी एकही गोष्ट नसल्यास या विद्यार्थ्यांना एअरपोर्टवरच कोरोना टेस्ट (Corona Test) करुन घ्यावी लागणार आहे. महत्वाचे म्हणजे या विद्यार्थ्यांचा आरटीपीसीआर टेस्टचा खर्च मुंबई एअरपोर्टच (Mumbai Airtport) उचलणार आहे.

You may like to read

कोरोना टेस्टचा रिपोर्ट निगेटिव्ह (Corona Test Report Negative) आल्यानंतर या विद्यार्थ्यांना बाहेर जाण्याची परवानगी दिली जाणार आहे. जर एखाद्या विद्यार्थ्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर त्याला कोरोना गाइडलाइन्सनुसार (Corona Guidlines) पुढील तपासणी आणि वैद्यकीयदृष्ट्या व्यवस्थापन करण्यासाठी पाठवले जाईल. तसंच, ज्या विद्यार्थ्यांनी कोरोना लस घेतलेली नाही किंवा ज्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आलेला नाही. त्यांना प्रवासापूर्वी हवाई सुविधा पोर्टलवर कागदपत्रे अपलोड करण्याची सूट दिली जाईल. असेच प्रवासी एअरपोर्टवर प्रवेश करु शकतात हा निर्णय मानवतेच्या आधारावर घेण्यात आला आहे.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: February 26, 2022 5:45 PM IST

Updated Date: February 26, 2022 5:46 PM IST