Gold Price Today: रशिया-युक्रेन युद्धाचा मोठा परिणाम, 51000 वर पोहोचले सोन्याचे दर
रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू झाल्याने जगभरात चिंता व्यक्त केली जात आहे. रशिया-युक्रेन संघर्षामुळे बँक निफ्टी, निफ्टी प्रायव्हेट बँक, निफ्टी ऑटो, निफ्टी फायनान्शिअल सर्विसेस, एफएमसीजी, आयटी इंडेक्स, मेटल, मीडिया, फार्मा, पीएसयू बँकसह सर्व इंडेक्समध्ये घसरण झाल्याचे दिसत आहे.

Gold Price Today: रशिया-युक्रेन या दोन्ही राष्ट्रांत युद्ध (Russia-Ukraine war) पेटले आहे. रशियने युक्रेमवर हवाई हल्ले केले आहेत. आतापर्यंत युक्रेनमध्ये 7 नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. दुसरीकडे, या दोन्ही देशांतील संघर्षाचा थेट परिणाम भारतीय सराफा बाजार आणि शेअर मार्केटवर झाल्याचे पाहायला मिळत आहे. सराफा बाजारात गुरुवारी सोने आणि चांदी दरात मोठी (Gold-Silver Price Today) तेजी पाहायला मिळाली. तर भारतीय शेअर बाजारातही आज मोठी घसरण झाली. सेन्सेक्स (Sensex) पडझडीसह उघडला. निफ्टीमध्येही (Nifty) घसरण दिसून आली. बाजार सुरू होतात सेन्सेक्स तब्बल 1813 अंकांनी कोसळला.
Also Read:
- Russia Ukraine War: रशिया-युक्रेन युद्धात 'डर्टी बॉम्ब'ची भीती, जाणून घ्या किती घातक आहे हा बॉम्ब
- Russia Ukraine War: भारतीयांनी तातडीने युक्रेन सोडावे, भारतीय दुतावासाने पुन्हा दिल्या सूचना!
- Balipratipada 2022: बलिप्रतिपदेच्या मुहूर्तावर उद्या शेअर बाजार राहणार बंद, मुहूर्ताच्या व्यवहाराने घेतली उसळी
दोन्ही देशातील संघर्षाचा परिणाम शेअर बाजारातही दिसून आला. अमेरिकन शेअर बाजारातही मोठ्या घसरणीसह बंद झाला.
मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) एप्रिल डिलिवरी सोने दरात 1.42 टक्क्यांची मोठी तेजी आहे. या वाढीमुळे सोने दर 51,000 वर पोहोचला आहे. तसेच चांदीच्या दरातही आज तेजी आहे. चांदीचा भाव (Silver Price Today) आहे 1.40 टक्क्यांच्या तेजीसह ट्रेड करत आहे.
काय आहेत सोने-चांदी आजचे दर ? (Gold Silver Price) –
एप्रिल डिलिवरी सोन्याचे आजचे दर 1.42 टक्क्यांच्या मोठ्या तेजीसह 51,095 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. चांदीच्या दरातही 1.40 टक्क्यांची वाढ झाली आहे. या वाढीसह चांदीचा भाव 65,490 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचला आहे. रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा सोन्याच्या दरावर थेट परिणाम झाल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर जगभरातील शेअर बाजारात देखील अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे गुंतवणुकदार पुन्हा एकदा सोन्याच्या गुंतवणुकीकडे वळले आहेत.
सेन्सेक्स तब्बल 1813 अंकांनी कोसळला..
रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू झाल्याने जगभरात चिंता व्यक्त केली जात आहे. रशिया-युक्रेन संघर्षामुळे बँक निफ्टी, निफ्टी प्रायव्हेट बँक, निफ्टी ऑटो, निफ्टी फायनान्शिअल सर्विसेस, एफएमसीजी, आयटी इंडेक्स, मेटल, मीडिया, फार्मा, पीएसयू बँकसह सर्व इंडेक्समध्ये घसरण झाल्याचे दिसत आहे. भारतीय शेअर बाजारावर मोठा परिणाम दिसून आला. भारतीय शेअर बाजारात आज सेन्सेक्स (Sensex) पडझडीसह उघडला तर निफ्टीमध्येही (Nifty) घसरण दिसून आली. सेन्सेक्स तब्बल 1813 अंकांनी कोसळला. बाजार उघडता सुरुवातीला सेन्सेक्समध्ये 1457 अंकांची घसरण झाली. तर निफ्टीतही 404 अंकांची घसण होऊन 16616 अंकांनी सुरु होता.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या