मुंबई : सॅमसंग गॅलेक्सी एम 32 (Samsung Galaxy M32) स्मार्टफोन आज म्हणजे 28 जूनपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. हा स्मार्टफोन मागच्या आठवड्यातच भारतामध्ये लाँच (Lauch in india) करण्यात आला. हा स्मार्टफोन दोन रॅम मॉडलमध्ये उपलब्ध आहे. आपल्या बजेट रेंजमध्ये लाँच करण्यात आलेल्या या स्मार्टफोनमध्ये युजर्सला 6,000mAhची दमदार बॅटरी (powerfull Battery) मिळणार आहे. या व्यक्तिरिक्त उत्कृष्ट कार्यक्षमतेसाठी या स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio G80 प्रोसेसर देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये (Smartphone) देण्यात आलेल्या स्टोरेजला 1TB पर्यंत एक्सपेंड केला जाऊ शकतो. तसंच फोटोग्राफीसाठी (Photography) या स्मार्टफोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.Also Read - OnePlus 10RT लवकरच भारतामध्ये होणार लाँच, जाणून घ्या फीचर्स आणि बरंच काही!

samsung Galaxy M32ची किंमत –

samsung Galaxy M32 स्मार्टफोनच्या 4GB + 64GB मॉडेलची किंमत 14,999 रुपये आहे. तर 6GB + 128GB मॉडेलची किंमत 16,999 रुपये आहे. हा स्मार्टफोन ब्लॅक आणि लाइट ब्ल्यू कलर ऑप्शन्समध्ये (Black and light blue color options) उपलब्ध आहे. आज दुपारी 12 वाजता भारतीय बाजारात हा स्मार्टफोन पहिल्यांदा विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. हा स्मार्टफोन तुम्ही Amazonवरुन खरेदी करु शकता. याशिवाय सॅमसंग इंडिया ऑनलाइन स्टोअर (Samsung India online store) आणि रिटेल स्टोअरमध्येही विक्रीसाठी हा स्मार्टफोन उपलब्ध असेल. कंपनीने या स्मार्टफोनसह ऑफर देखील दिल्या आहेत. याअंतर्गत, वापरकर्त्यांना स्मार्टफोनवर 1,250 रुपयांचा कॅशबॅक मिळू शकेल परंतू यासाठी तुमच्याकडे आयसीआयसीआय बँकेचे कार्ड (ICICI Bank Card) असणे आवश्यक आहे. Also Read - Samsung Galaxy M52 5G : सॅमसंगच्या 'या' जबरदस्त स्मार्टफोनवर मिळत आहे 9 हजार रुपयांची सूट, जाणून घ्या काय आहेत फीचर्स

Samsung Galaxy M32चे फीचर्स –

Samsung Galaxy M32 या स्मार्टफोनमध्ये ड्युअल सिम सपोर्ट (Dual SIM support) आणि अँड्रॉइड 11 (Android 11) सह One UI 3.1 सपोर्ट देण्यात आले आहे. हा स्मार्टफोन octa-core MediaTek Helio G80 प्रोसेसरवर काम करतो. यामध्ये देण्यात आलेल्या स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डच्या (MicroSD card) मदतीने 1TBपर्यंत एक्सपेंड करु शकतो. यामध्ये 6.4 इंचाची फुल एचडी+ सुपर एमोलेड डिस्प्ले (HD + Super AMOLED display) देण्यात आला आहे. जो 90Hz रिफ्रेश रेटसह येतो. Also Read - Apple चा नवीन MacBook Pro भारतात प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन!

Samsung Galaxy M32चा कॅमेरा –

Samsung Galaxy M32 या स्मार्टफोनमध्ये फोटोग्राफीसाठी चार रियर कॅमेरे (4 rear cameras for photography) देण्यात आले आहेत. या स्मार्टफोनचा मेन सेन्सर 64 MPचा आहे, तर 8 MPचा अल्ट्रा वाइड एंगल लेन्स, 2MPचा मॅक्रो शूटर आणि 2MPचा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. जर तुम्हाला सेल्फीची (Selfie) आवड असेल तर तुम्हाला या स्मार्टफोनमध्ये 20MPचा फ्रंट कॅमेरा मिळेल. ज्याच्या मदतीने तुम्ही व्हिडिओ कॉलिंगचा आनंद घेऊ शकता. या स्मार्टफोनचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये देण्यात आलेली 6,000mAhची बॅटरी. कंपनीचा असा दावा आहे की, ही बॅटरी 25 तासांचा व्हिडिओ प्लेटाइम, 130 तास म्युझिक प्लेटाइम आणि 40 तासांचा टॉक टाइम देण्यास सक्षम आहे.