Top Recommended Stories

Government Job: सरकारी नोकरीची सूवर्ण संधी, पगार 80000 रुपये... असा करा अर्ज

Government Job: तुम्ही उच्चशिक्षित आहात आणि सरकारी नोकरीचा (Sarkari Nokari) शोध घेत असाल तर तुमच्यासाठी खूशखबर आहे. धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (Shri. Bhausaheb Hire, Government Medical College, Dhule) काही जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू (GMC Dhule Recruitment 2022) झाली आहे. याबाबत अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे.

Published: April 24, 2022 9:04 PM IST

By India.com News Desk | Edited by पी.संदीप

Representative image
Representative image

Government Job: उच्चशिक्षित तरुणांसाठी खूशखबर आहे. जे सरकारी नोकरीचा (Sarkari Nokari) शोध घेत असतील, त्यांच्यासाठी सूवर्णसंधी आहे. धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (Shri. Bhausaheb Hire, Government Medical College, Dhule) काही जागा भरल्या जात आहेत. त्यात वैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ निवासी, कनिष्ठ निवासी पदांचा समावेश आहे. भरती प्रक्रिया सुरू (GMC Dhule Recruitment 2022) झाली असून याबाबत अधिसूचना (Government Jobs in Maharashtra) देखील जारी करण्यात आली आहे. पात्रता प्राप्त उमेदवार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 एप्रिल 2022 आहे.

Also Read:

या भरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://dhule.gov.inaa/ या लिंकवर क्लिक करा.

You may like to read

खालील पदांसाठी मागवले अर्ज…

– वैद्यकीय अधिकारी (Medical Officer)
– वरिष्ठ निवासी (Senior Resident)
– कनिष्ठ निवासी (Junior Resident)

काय आहे आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव?

> वैद्यकीय अधिकारी (Medical Officer)

– अर्ज करणारा उमेदवार MBBS (Bachelor of Medicine and Bachelor of Surgery) असावा.
– उमेदवाराने मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्था किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलेले असावे.
– उमेदवाराला संबंधित पदाचा किमान अनुभव असणे आवश्यक.
– उमेदवाराने संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि नियम पूर्ण करणे आवश्यक.

> वरिष्ठ निवासी (Senior Resident) –

– अर्ज करणारा उमेदवार MBBS (Bachelor of Medicine and Bachelor of Surgery) असावा.
– उमेदवाराने मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्था किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलेले असावे.
– उमेदवाराला संबंधित पदाचा किमान अनुभव असणे आवश्यक.
– उमेदवाराने संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि नियम पूर्ण करणे आवश्यक.

कनिष्ठ निवासी (Junior Resident) –

– अर्ज करणारा उमेदवार MBBS (Bachelor of Medicine and Bachelor of Surgery) असावा.
– उमेदवाराने मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्था किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलेले असावे.
– उमेदवाराला संबंधित पदाचा किमान अनुभव असणे आवश्यक.
– उमेदवाराने संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि नियम पूर्ण करणे आवश्यक.

आवश्यक कागदपत्रे…

– दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
– लिव्हिंग सर्टीफिकेट
– जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
– आधारकार्ड किंवा वाहनचालक परवाना.
– पासपोर्ट साईजचे फोटो.

खालील पत्त्यावर अर्ज करावा…

डीन ऑफिस, श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रेसिडेन्सी पार्क हॉटेल समोर, मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग, साक्री-सुरत बायपास, चक्करबर्डी परिसर, धुळे, जिल्हा-धुळे, महाराष्ट्र- 424002

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 एप्रिल 2022.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या