Top Recommended Stories

SBI Alert: फसवणूक टाळण्यासाठी या नंबरवरुन आलेले कॉल उचलू नका, एसबीआयचा ग्राहकांना इशारा!

SBI Alert: SBI ने ग्राहकांना जागरूक करण्यासाठी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन ट्वीट देखील केले आहे आणि सर्व बँक ग्राहकांना फिशिंग घोटाळ्यांमध्ये कथितरित्या सहभागी असलेल्या निवडक नंबरवरून कॉल न घेण्याचे आवाहन केले आहे.

Published: April 24, 2022 3:05 PM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

SBI
(FILE PHOTO)

SBI Alert : सध्याच्या काळामध्ये फसवणुकींच्या घटना (Fraud Cases) मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. फसवणूक करणाऱ्या व्यक्ती फसवणूक करण्यासाठी विविध पद्धतींचा अवलंब करतात. तुमचे बँक अकाऊंट (Bank Account) बंद होणार आहे आणि ते सक्रिय ठेवण्यासाठी तुम्हाला काही माहिती द्यावी लागेल किंवा ओटीपी द्यावा लागेल असे सांगून फसवणूक केली जाते. अनेक लोकं अशा लोकांच्या भानगडीत पडतात आणि एटीएम कार्डपासून (ATM Card) ते पिनपर्यंत सर्व माहिती देतात आणि काही वेळातच त्यांच्या अकाऊंटमधून संपूर्ण पैसे चोरीला जातात. जेव्हा त्यांच्या फोनवर पैसे काढल्याचे मेसेज येऊ लागतात तेव्हा त्यांना आपली फसवणूक झाली असल्याचे कळते. कधीतरी तुमच्यासोबत असे घडले असेल किंवा तुमच्या माहितीत कोणासोबत असे घडले असेल. अशा परिस्थितीत स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) पुन्हा एकदा आपल्या ग्राहकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.

हा नंबर लक्षात ठेवा –

एसबीआयच्या (State Bank Of India) म्हणण्यानुसार, आजकाल बनावट फोन कॉल्स खूप वाढले आहेत ज्यामुळे बँक अकाऊंट असलेल्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. एसबीआयने स्पष्टपणे सांगितले आहे की, अशा घटना टाळण्यासाठी +91-8294710946 आणि +91-7362951973 नंबरवरून येणारे कॉल उचलू नका. ऑनलाइन फसवणूक लक्षात घेता अकाऊंट धारकांनी जरा सतर्क राहा. SBI ने ग्राहकांना जागरूक करण्यासाठी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन ट्वीट देखील केले आहे आणि सर्व बँक ग्राहकांना फिशिंग घोटाळ्यांमध्ये कथितरित्या सहभागी असलेल्या निवडक नंबरवरून कॉल न घेण्याचे आवाहन केले आहे.

You may like to read

या गोष्टी करणं टाळा –

याशिवाय, बँकेने असेही म्हटले आहे की, ‘कर्जदाराने एसबीआयशी अधिकृतपणे संबंधित नसलेल्या कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेच्या चर्चेत अडकू नये. वास्तविक, हे गुंड अनेक लोकांच्या अकाऊंटमधील पैसे काढण्यासाठी अनेक पद्धती अवलंबतात. अनेक वेळा ते कर्ज मिळवण्याच्या नावाखाली केवायसी अपडेटबद्दल बोलतात आणि आवश्यक माहिती विचारतात आणि नंतर फिशिंग हल्ला करून खाते रिकामे करतात. त्यामुळे यापुढे अकाऊंटधारकांनी असा कोणताही फोन उचलून आपल्या अकाऊंटशी संबंधितक कोणतीही माहिती सांगू नका.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.