SBI Rules Changed: स्टेट बँकने या नियमामध्ये केला बदल, जाणून घ्या कसा होईल तुम्हाला फायदा!
स्टेट बॅकेने नियम बदलल्यामुळे ग्राहकांवर या सेवा शुल्कावर अधिक पैसे द्यावे लागणार आहेत...

SBI Rules Changed: देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) 1 फेब्रुवारी 2022 पासून 5 लाख रुपयांपर्यंतच्या IMPS निधी हस्तांतरणावर (IMPS Fund Transfer) कोणतेही शुल्क आकारणार नाही. पण यापेक्षा मोठी रक्कम हस्तांतरित केल्यास जास्त शुल्क भरावे लागेल. या नियमाचा कमी पैसे ट्रान्सफर (Money Transfer) करणाऱ्यांना फायदा होणार आहे. अशामध्ये जे लोक जास्त पैसे हस्तांतरित करतात त्यांना अधिक सेवा शुल्क द्यावे लागणार आहे….
Also Read:
आता किती असेल सर्व्हिस चार्ज?
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (State Bank Of India) मते, 5 लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या IMPS द्वारे मनी ट्रान्सफर केल्यास 20 रुपये + GST शुल्क आकारले जाईल. ऑक्टोबर 2021 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) IMPS द्वारे व्यवहारांची रक्कम 2 लाख रुपयांवरून 5 लाख रुपये केली. रिझर्व्ह बँकेने IMPS च्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहारांची मर्यादा वाढवली होती. आता 2 लाखांऐवजी तुम्ही एका दिवसात 5 लाख रुपये ट्रान्सफर करू शकता.
IMPS म्हणजे काय?
IMPS म्हणजेच तात्काळ पेमेंट सेवा (Immediate payment service) ही नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचा (NPCI) एक महत्त्वाचा भाग आहे. याद्वारे निधी हस्तांतरण 24X7 केले जाऊ शकते. इंटरनेट बँकिंग (Internet banking) व्यतिरिक्त निधी हस्तांतरण मोबाइल बँकिंग अॅप्स (Mobile Banking Apps), बँक शाखा (Bank Branches), एटीएम (ATM), एसएमएस (SMS) आणि IVRS द्वारे केले जाते. RBIने वाढवलेली दैनंदिन व्यवहार मर्यादा SMS आणि IVRSला लागू होत नाही. एसएमएस आणि IVRSद्वारे फक्त रु 5000 ट्रान्सफर केले जातात.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या