SBI Jobs 2022: एसबीआयमध्ये नोकरीची सुवर्ण संधी, तगडा पगार, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया आणि तपशील
SBI Recruitment 2022 : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (SBI) नोकरी करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. एसबीआयने विविध पदांवर भरती जाहीर केली आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 एप्रिल 2022 आहे.

SBI Recruitment 2022 : बँकेत नोकरी (Bank Jobs 2022) शोधणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) विविध रिक्त पदांवर भरती जाहीर केली आहे. या संदर्भात एसबीआयने (SBI Jobs 2022) एक अधिकृत नोटिफिकेशन देखील जारी केले आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 एप्रिल 2022 आहे. SBI ने एकूण 8 स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर (SBI Manager Job) पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांवर अर्ज करण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार SBI च्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर जाऊन अर्ज करू शकतात. सध्या या पदांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. उमेदवारांनी हे लक्षात घ्या की या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया (SBI recruitment 2022) 28 एप्रिल रोजी संपेल.
Also Read:
- SBI Recruitment 2022 : एसबीआयमध्ये 54 स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर पदांची भरती, उमेदवारांनी असा करा अर्ज!
- TMC Recruitment 2022: टाटा मेमोरियल सेंटरमध्ये 164 पदांसाठी भरती, 60,000 रुपये पगार; जाणून घ्या पात्रता
- ITBP Recruitment 2022: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! आयटीबीपीमध्ये कॉन्स्टेबल पदांसाठी भरती! ही आहे पात्रता
SBI recruitment 2022: रिक्त पदांचा तपशील
एसबीआयच्या या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 8 अधिकारी पदांवर भरती केली जाणार आहे. यामध्ये व्यवस्थापक 2 पदे, सल्लागार 4 पदे आणि वरिष्ठ कार्यकारी पदांववर 2 उमेदवारांची निवड केली जाणार आहे. या पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि वयोमर्यादा पुढे देण्यात आली आहे.
SBI recruitment 2022: अर्ज शुल्क
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी (SBI recruitment 2022) सामान्य श्रेणीतील उमेदवारांसह, OBC आणि EWS उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून 750 रुपये भरावे लागतील. याशिवाय जे उमेदवार SC/ST किंवा PWD श्रेणीतील आहेत त्यांना अर्ज शुल्कात सूट देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी उमेदवार sbi.co.in या संकेतस्थळाला भेट देऊन (SBI recruitment 2022) अधिकृत अधिसूचना देखील पाहू शकतात.
वयोमर्यादा (SBI recruitment 2022 Age limit)
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांची वयोमर्यादा खाली पाहू शकता.
व्यवस्थापक – 25 ते 35 वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात.
सल्लागार – 63 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी अर्ज करू शकतात.
वरिष्ठ कार्यकारी – कमाल वय 32 वर्षे असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.
निवड प्रक्रिया (SBI Recruitment Selection Process)
भरतीसाठीची पात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांची निवड मुलाखतीच्या आधारे केली जाईल. शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. हे लक्षात घ्या की वरिष्ठ कार्यकारी (अर्थशास्त्रज्ञ) पदांसाठी उमेदवारांची निवड नेगोशिएशनच्या आधारे केली जाईल. या भरतीसंदर्भातील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी उमेदवार थेट या https://recruitment.bank.sbi/crpd-sco-2022-23-02/apply लिंकवर क्लिक करून अधिसूचना पाहू शकतात.