मुंबई : भारतीय स्टेट बँकमध्ये (Stat Bank of India) तुमचे अकाऊंट असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. 1 जुलैपासून एसबीआयच्या (SBI) नियमांमध्ये बदल होणार आहेत. हे बदल तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे. एसबीआय बँकेच्या एटीएममधून पैसे काढणे (Cash Withdrawal) आणि चेकबुकच्या (Check Book) नियमांमध्ये बदल होणार आहेत. एसबीआयने हा बदल बीएसबीडीवर (BSBD) लागू केला आहे. या नियमानुसार एका महिन्यात फक्त चार वेळा व्यवहार विनामूल्य असतील. यामध्ये बँकेची शाखा (Bank Branch) आणि एटीएममधून पैसे काढणे या गोष्टींचा समावेश आहे.Also Read - Educational loan : SBI ची खास योजना! 10 वीनंतर पुढच्या शिक्षणासाठी मिळणार दीड कोटींपर्यंतचे शैक्षणिक कर्ज

याचप्रमाणे, बँकेच्या चेक बुकसंदर्भातील नियमांतही बदल करण्यात आले आहेत. चेकबुक संदर्भातील नियम देखील 1 जुलैपासून लागू होणार आहे. बीएसबीडी खातेदारांना 10 पानांची चेकबुक विनामूल्य वापरण्याची परवानगी एसबीआय (SBI allows free use of checkbooks) देते. नवीन चेकबुक (New Checkbook) घेण्यास किंवा अधिक पानांसह चेकबुक देण्यास शुल्क आकारले जाणार आहेत. जीएसटीसह 10 पानांच्या पासबुकवर 40 रुपये आकारले जातील. एमर्जेंसीत चेक बुक घेण्यासाठी खातेधारकाला 50 रुपये अतिरिक्त द्यावे लागतील. तर ज्येष्ठ नागरिकांना चेकबुक वापर मर्यादेवर सूट देण्यात आली आहे. Also Read - SBI Recruitment 2022 : सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना SBI मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी, 641 पदांसाठी होणार भरती!

एसबीआयच्या नियमामुसार, बँकेची शाखा (Cash Withdrawal from Bank) आणि एटीएममधून पैसे काढण्यासाठी (Cash Withdrawal form ATM) 1 जुलैपासून शुल्क आकारले जाईल. सुरुवातीचे चार व्यवहार विनामूल्य असतील. यानंतर प्रत्येक व्यवहारावर 15 रुपये अधिक जीएसटी आकारला जाईल. एसबीआय एटीएम (SBI ATM) व्यतिरिक्त इतर बँकेच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठीही हेच शुल्क लागू असेल. Also Read - SBI च्या ग्राहकांनो सावधान! तुम्हालाही हा मेसेज आला असेल तर लगेच करा डिलीट, बँक अकाऊंट होईल रिकामे

दरम्यान, एसबीआय ग्राहकांसाठी आणखी एक महत्वाची बातमी आहे. कारण तुम्ही बँकेशी संबंधित हे काम केले नसेल तर तुम्हाला दंड (Fined) भरावा लागू शकतो. तुम्ही आपला पॅन नंबर (Pan Number) आधारकार्डशी (Aadhaar Card) लिंक केला नसेल तर हे काम आधी करुन घ्या. जर हे काम केले नसेल तर कोरोनाच्या संकट काळात तुम्हाला एक हजार रुपयांचा दंड भरावा लागू शकतो. तुमचा पॅनकार्ड नंबर आधारकार्डशी लिंक (Pan Card Link With Aadhaar Card) करण्यासाठी प्राप्तीकर विभागने (Income Tax Department) 30 जून 2021 ही अंतिम तारीख दिली आहे.