By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.
SBI Recruitment: सरकारी नोकरीच्या शोधात आहात? मग 31 मार्चपर्यंत करा या बँकेत अर्ज!
SBI Recruitment: एसबीआय बँकेच्या विविध विभागांमध्ये स्पेशालिस्ट कॅडर ऑफिसर्सची नियुक्ती या भरती प्रक्रियेतून केली जाणार आहे. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी 31 मार्च 2022 ही अंतिम मुदत आहे.

SBI Recruitment: सरकारी बँकेत (Government Bank) नोकरीच्या (Job) शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. स्टेस्ट बँक ऑफ इंडियातर्फे (SBI) विविध पदांसाठी भरती प्रक्रिया (SBI Recruitment) राबविण्यात येत आहे. बँकेच्या विविध विभागांमध्ये स्पेशालिस्ट कॅडर ऑफिसर्सची नियुक्ती या भरती प्रक्रियेतून केली जाणार आहे. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी 31 मार्च 2022 ही अंतिम मुदत आहे. चला तर मग जाणून घेऊया भरती प्रक्रियेसंदर्भातील अधिक माहिती…
या पदांसाठी होणार भरती –
बँकेच्या विविध विभागांमध्ये स्पेशालिस्ट कॅडर ऑफिसर्सची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यानुसार मुख्य माहिती अधिकारी- 1 जागा, मुख्य तंत्रज्ञान अधिकारी- 1 जागा आणि उपमुख्य तंत्रज्ञ अधिकारीच्या 2 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या पदांसाठी 4 मार्च 2022 पासून भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. 31 मार्च 2022 ही अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे. इच्छूक उमेदवार www.sbi.co.in या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करू शकतात.
शैक्षणिक पात्रता –
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या विविध विभागांमध्ये स्पेशालिस्ट कॅडर ऑफिसर्स होण्यासाठी उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतून संबंधित विषयात पदवीधर असला पाहिजे. तसेच उपमुख्य तंत्रज्ञान अधिकारी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 45 वर्षांपेक्षा जास्त नसावे. तर इतर पदांसाठी कमाल वय 55 वर्षे निश्चित करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी बँकेच्या संकेतस्थळावर जाऊन अधिसूचना वाचा.
अशी होईल निवड –
या पदांसाठी अर्ज आलेल्या उमेदवारांची मुलाखत घेण्यात येणार आहे. मुलाखतीच्या आधारे पात्र उमेदवाराची निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी उमेदवारांनी एसबीआय स्पेशालिस्ट कॅडर ऑफिसर रिक्रूटमेंट 2022 साठी बँकेच्या www.sbi.co.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अधिसूचनेची संपूर्ण माहिती वाचणे आवश्यक आहे.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या