Top Recommended Stories

SBI SCO Recruitment 2022: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी मिळवण्याची संधी, असिस्टंट मॅनेजर पदासाठी करा अर्ज!

SBI SCO Recruitment 2022: एसबीआयमध्ये एकूण 48 पदांसाठी भरती होणार आहे. असिस्टंट मॅनेजर या पदांसाठी ही भरती होणार आहे.

Updated: February 8, 2022 3:27 PM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

sbi sco recruitment 2022
sbi sco recruitment 2022

SBI SCO Recruitment 2022: बँकेमध्ये नोकरी (Bank Job) मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (State Bank Of India) सरकारी नोकरीसाठी (Government Job) जागा रिक्त आहेत. स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर या पदासाठी ही भरती होणार आहे. एसबीआयने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, एकूण 48 पदांची भरती करण्यात येणार आहे. असिस्टंट मॅनेजर (Network Security Specialist) आणि असिस्टंट मॅनेजर (Routing & Switching) या पदांसाठी ही भरती होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी एसबीआयची अधिकृत वेबसाईट sbi.coवर जाऊन अर्ज करु शकता. अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 फेब्रुवारी आहे. ऑनलाइन परीक्षेची (Online Exam) संभावित तारीख 20 मार्च 2022 असल्याचे एसबीआयने सांगितले आहे.

Also Read:

रिक्त पदांचे तपशील –

एकूण पदं- 48
सहाय्यक व्यवस्थापक (नेटवर्क सुरक्षा विशेषज्ञ) – 15 पदं
सहाय्यक व्यवस्थापक (रूटिंग आणि स्विचिंग) – 33 पदं

You may like to read

शैक्षणिक पात्रता –

अर्ज करणारा उमेदवार कोणत्याही स्ट्रीममधून पदवीधर असणे आवश्यक आहे. उमेदवार प्रथम श्रेणीत उत्तीर्ण असावा. 31 ऑगस्ट 2021 रोजी उमेदवारांचे कमाल वय 40 वर्षे असावे.

अर्ज कसा करावा –

– या भरती प्रक्रियेला अर्ज करण्यासाठी उमेदवारांना sbi.co.in या वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
– याठिकाणी Current Vacancy च्या पर्यायावर क्लिक करा.
– आता पुढील टप्प्यात नियमित आधारावर विशेषज्ञ संवर्ग अधिकाऱ्यांची भरती जाहिरात क्र. CRPD/SCO/2021-22/26 या लिंकवर क्लिक करा.
– तुम्हाला विचारलेली माहिती भरून येथे नोंदणी करा.
– आता संपूर्ण अर्ज भरा.
– अर्जाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याची प्रिंट काढून घ्या.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: February 8, 2022 3:27 PM IST

Updated Date: February 8, 2022 3:27 PM IST