SBI Toll Free Number: एसबीआयच्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी! बँकेने सुरू केली नवीन सुविधा

एसबीआयच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक एसबीआय आपल्या ग्राहकांसाठी बँकिंग सेवा सुधारण्याचा प्रयत्न करत आहे. बँकेने ग्राहकांच्या तात्काळ सुविधेसाठी टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून दिला आहे.

Published: January 24, 2022 5:09 PM IST

By India.com News Desk | Edited by Chandrakant Jagtap

जानिए SBI में लॉकर की कीमत
जानिए SBI में लॉकर की कीमत

SBI Toll Free Number: एसबीआयच्या (State Bank of India) ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक एसबीआय (SBI) आपल्या ग्राहकांसाठी बँकिंग सेवा सुधारण्याचा प्रयत्न करत आहे. बँकेने ग्राहकांच्या सुविधेसाठी 1800 1234 हा टोल फ्री क्रमांक (Toll free number) उपलब्ध करून दिला आहे. या क्रमांकावरून आता तुम्हाला घरबसल्या बँकेच्या विविध सुविधांचा (bank facilities) लाभ घेता येणार आहे.

Also Read:

एकाच क्रमांकावरून होतील अनेक कामं

स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) दिलेल्या माहितीनुसार या टोल फ्री नंबरवर कॉल करून तुम्ही तुमची बँक शिल्लक (Bank balance) तसेच मागील व्यवहारांचे तपशील (Previous Transactions Details) मिळवू शकता. म्हणजेच या एका नंबरवरून तुम्हाला तुमच्या खात्याशी संबंधित सर्व माहिती मिळेल. या टोल फ्री क्रमांकावर कॉल किंवा मेसेज (Call and message Service) दोन्हीद्वारे या सुविधांचा लाभ घेता येईल.

बँकेने ट्वीट करून दिली माहिती

एसबीआयने केलेल्या ट्वीटमध्ये (SBI Tweet) म्हटले की ‘घरी रहा, सुरक्षित रहा, आम्ही तुमच्या सेवेसाठी हजर आहोत. SBI तुम्हाला एक संपर्करहित सेवा देत आहे जी तुम्हाला तुमच्या तात्काळ बँकिंग गरजांसाठी (Banking needs) मदत करेल. तुमच्या खात्यासंबंधी माहितीसाठी आमच्या टोल फ्री क्रमांक 1800 1234 वर कॉल करा.

जाणून घ्या कसा होईल फायदा?

  • एसबीआयच्या या टोल फ्री क्रमांकावर तुम्ही तुमची बँक शिल्लक तपासू शकता.
  • या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून तुम्ही तुमच्या शेवटच्या पाच व्यवहारांची माहिती मिळवू शकता.
  • तुम्ही SBI च्या टोल फ्री क्रमांक 1800 1234 वर मेसेज करून तुमची बँक शिल्लक आणि शेवटच्या पाच व्यवहारांची माहिती देखील मिळवू शकता.
  • या टोल फ्री क्रमांकावरून तुम्ही तुमचे एटीएम कार्ड ब्लॉक करू शकता.
  • तुम्ही या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून एटीएम कार्डसाठी अर्ज करू शकता.
  • या टोल फ्री क्रमांकाच्या मदतीने तुम्ही घरबसल्या तुमच्या एटीएम कार्डचा पिनही तयार करू शकता.
  • या टोल फ्री क्रमांकावरून तुमचे एटीएम कार्ड ब्लॉक केल्यानंतर तुम्ही नवीन कार्डसाठी अर्ज करू शकता.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 24, 2022 5:09 PM IST