पाटणा: बिहारमधील (Bihar)औरंगाबाद जिल्ह्यात (Aurangabad District) एक विचित्र प्रकरण समोर आलं आहे. पीडित महिलेनं एका मांत्रिकावर (​exorcist) बलात्काराचा (Rape) आरोप केला आहे. महिलेनं या संदर्भात पोलिसांत तक्रार (FIR) दाखल केली आहे. महिलेनं मुलासाठी मांत्रिकाकडून पूजापाठ केला होता. यानंतर महिलेनं थेट पोलिस स्टेशन गाठलं आणि त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. ‘मांत्रिकानं स्वप्नात येऊन माझ्यावर अनेकदा बलात्कार केला’, असं महिलेनं आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.Also Read - Sangli Mass Suicide Case : सांगली सामूहिक आत्महत्या प्रकरणाला नवं वळण, विष घालून हत्या केल्याचे तपासात उघड!

औरंगाबाद ( Aurangabad) जिल्ह्यातील कुडवा पोलिस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. गांधी मैदान भागात तक्रारदार महिला राहते, गेल्या जानेवारी महिन्यात ती मांत्रिक प्रशांत चतुर्वेदीच्या संपर्कात आली होती. मांत्रिक काली बाडी मंदिरात पूजापाठ करतो. पीडित महिलेचा मुलगा आजारी होता. तो लवकर बरा व्हावा, यासाठी महिलेनं मांत्रिकाकडून पूजापाठ केला होता. परंतु त्यानंतर 15 दिवसांतच महिलेच्या मुलाचा मृत्यू झाला. Also Read - Viral Video: वरातीमध्ये नवरदेवाने अतिउत्साहात हवेत केला गोळीबार,  गोळी लागून मित्राचा झाला मृत्यू!

मुलाच्या मृत्यूनंतर महिलेला मोठा धक्का बसला. तिनं काली बाडी मंदिरात जाऊन मांत्रिकाला मुलाचा मृत्यू झालाच कसा, याबाबत जाब विचारला. परंतु काही एक ऐकून न घेता मांत्रिकांनं आपल्यावर बलात्काराचा प्रयत्न केल्याचा आरोप महिलेनं केला. एवढंच नाही तर आपल्या मुलानं मांत्रिकाच्या तावडीतून सुटका केल्याचा दावा देखील पीडित महिलेनं केला आहे. आपली बदनामी होईल, या भीतीपोटी महिलेनं पोलिसांत तक्रार दिली नसल्याचं सांगितलं आहे. परंतु त्यानंतर आरोपी मांत्रिक आपल्या स्वप्नात येत असून तो वारंवार बलात्कार करत असल्याचा आरोप महिलेनं केल्याची माहिती कुडवा पोलिस स्टेशनच्या एसएचओ अंजनी कुमार यांनी दिली आहे. Also Read - Sathish Vajra Death: चित्रपटसृष्टी हादरली! घरात रक्ताच्या थारोळ्यात आढळला अभिनेत्याचा मृतदेह

पोलिसांनी या प्रकरणी मांत्रिक प्रशांत चतुर्वेदी याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. चतुर्वेदीनं महिलेनं केलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. एवढं काय तर तो तक्रारदार महिलेला ओळखत नसल्याचं त्यानं चौकशीत सांगितलं आहे. पोलिसांना अद्याप चतुर्वेदीच्याविरोधात एकही पुरावा मिळलेला नाही. पोलिस पुढील तपास सुरू असल्याचं एसएचओ अंजनी कुमार यांना सांगितलं आहे.