Top Recommended Stories

Sputnik Light Permission: या लसीचा एकच डोस भारी, दुसऱ्या डोसची गरजच नाही, DCGIने वापरासाठी दिली मंजुरी!

Sputnik Light Permission : केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडविया यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे. स्पुतनिक लाईट या लसीमुळे कोरोनाविरोधातील लढाईला सामुहिक बळ मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले.

Updated: February 7, 2022 8:42 AM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

Sputnik Light
Sputnik Light

Sputnik Light Permission : भारतामध्ये सध्या कोरोनाची तिसरी लाट (Third Wave Of Corona) आहे. कोरोना रुग्णांची (Corona Patient) संख्येत चढ-उतार पाहायला मिळत आहे. कधी-कधी रुग्णसंख्या कमी होतेय पण कोरोनाची भीती काही संपलेली नाही. कोरोनावर आपण आतापर्यंत ज्या लसी (Corona Vaccine) घेतल्या आहेत या कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस आपण घेतले आहे. पण आता एक अशी लस आली आहे. त्या लसीचा एकच डोस खूप प्रभावी असणार आहे. तिचा दुसरा डोस घेण्याची गरज लागणार आहे. ही लस म्हणजे स्पुतनिक लाईट (Sputnik Light). या लसीच्या वापराला डीसीजीआयकडून (DCGI) मंजुरी मिळाली आहे.

स्पुतनिक लाईट ही कोरोना प्रतिबंधक लस (Corona Vaccine) खूपच शक्तीशाली आहे. ही लस ऐवढी प्रभावी आहे की या लसीमध्ये दोन डोसची ताकद आहे. ड्रग्ज कंट्रोल जनरल ऑफ इंडियाने (Drugs Control General of India) सिंगल डोसच्या स्पुतनिक लाईटच्या वापरला मंजुरी दिली आहे. डीसीजीआयकडून स्पुतनिक लाईटच्या वापरचा मार्ग मोकळा झाला आहे. या लसीच्या लसीकरणाचा वेग वाढविण्यास मदत मिळणार आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडविया (Union Health Minister Mansukh Mandvia) यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे.

You may like to read

स्पुतनिक लाईट या लसीमुळे कोरोनाविरोधातील (Corona Virus) लढाईला सामुहिक बळ मिळाले आहे, असं मांडविया यांनी सांगितले. डीसीजीआयकडून या लसीच्या वापरासाठी दोन दिवसांपूर्वी शिफारस करण्यात आली होती. आता त्याला मंजुरी मिळाल्यामुळे भारतातून कोरोना हद्दपार करण्यासाठी फायदेशीर ठरेल. या कोरोना प्रतिबंधक लसीला मंजुरी मिळाल्यानंतर भारतामध्ये आता कोरोनावरील नऊ लसी झाल्या आहेत. यामध्ये कोव्हिशिल्ड (Covishild), कोव्हॅक्सिन (Co-vacin, कोवोव्हॉक्स, कॉबेव्हॅक्स, मॉडर्ना (Moderna), जॉन्सन अॅण्ड जॉन्सन (Johnson & Johnson) आणि कोव्ह डी (Cove D), स्पुतनिक व्ही (Sputnik V) या लसींचा समावेश आहे. रशियाच्या स्पुतनिक डी या लसीचा आधीपासूनच देशात वापर होत आहे. त्यात आता नवीन लस स्पुतनिक लाईट ही खूपच फायदेशीर ठरणार आहे.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.