नवी दिल्ली: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी सुवर्ण संधी आहे. यासाठी स्टाफ सिलेक्शन कमिशनने(SSC Recruitment 2021) सिलेक्शन पोस्ट फेज 09 चे (Selection Posts Phase IX 2021) नोटीफिकेशन जारी करून अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार जे या पदांसाठी अर्ज करू इच्छितात (SSC Selection Posts Recruitment 2021) ते SSC ची अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी नोंदणीची प्रक्रिया (SSC Recruitment 2021) 24 सप्टेंबरपासून सुरू झाली आहे.Also Read - DRDO Recruitment: डीआरडीओमध्ये शिकाऊ उमेदवाराच्या अनेक पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता

या शिवाय उमेदवार थेट या लिंकवर जाऊन https://ssc.nic.in/Portal/Apply या पदांसाठी (SSC Recruitment 2021) अर्ज करू शकतात. तसेच उमेदवार https://ssc.nic.in/SSCFileServer/PortalManagement या लिंकवर जाऊन भरती संदर्भातील अधिकृत (SSC Recruitment 2021) अधिसूचना देखील पाहू शकता. या भरती प्रक्रियेअंतर्गत (SSC Recruitment 2021) एकूण 3261 पदे भरली जाणार आहेत. या पदांसाठी निवड होणारे उमेदवार केंद्र सरकारच्या 271 विभागांमध्ये नियुक्त केले जातील. Also Read - ICG Recruitment 2021: भारतीय तटरक्षक दलात या पदांवर मेगाभरती, उद्यापासून सुरू होतेय अर्ज प्रक्रिया

SSC Selection Posts Recruitment 2021 साठी महत्वाच्या तारखा

अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख – 24 सप्टेंबर 2021
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 ऑक्टोबर 2021
ऑनलाईन फी भरण्याची शेवटची तारीख – 28 ऑक्टोबर 2021 Also Read - Ayush Ministry Recruitment 2021: आयुष मंत्रालयात नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी, 5वी आणि 10वी पास असणाऱ्यांनी तात्काळ करा अर्ज!

SSC Selection Posts Recruitment 2021 साठी रिक्त पदांचा तपशील

एकूण पदांची संख्या- 3261

SSC Selection Posts Recruitment 2021 साठी आवश्यक पात्रता आणि निकष

या भरती प्रक्रियेअंतर्गत अर्ज करू इच्छिणारे उमेदवार दिलेल्या अधिसूचनेमध्ये यासंबंधी अधिकृत तपशीलवार अधिसूचना पाहू शकतात.

SSC Selection Posts Recruitment 2021 साठी अर्ज शुल्क

अर्ज स्वरुपात उमेदवारांना 100 रुपये भरावे लागतील. त्यासाठी ऑनलाइन पद्धतीने भीम यूपीआय, नेट बँकिंग, व्हिसा, मास्टरकार्ड, मेस्ट्रो, रुपे क्रेडिट किंवा डेबिट कार्डचा वापर करून किंवा एसबीआय शाखांमध्ये एसबीआय चलान जनरेट करून शुल्क भरता येईल. महिला उमेदवारांसह अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी), अपंग व्यक्ती (पीडब्ल्यूडी) आणि आरक्षणासाठी पात्र माजी सैनिकांशी (ईएसएम) संबंधीत उमेदवारांना शुल्कात सुट देण्यात आली आहे.

SSC Selection Posts Recruitment 2021 साठी कधी होईल परीक्षा

परीक्षा पुढील वर्षीच्या जानेवारी किंवा फेब्रुवारीत होईल. ही परीक्षा कॉम्प्युटर आधारीत असणार आहे. 3261 पदांसाठी भरती होणार असून ही परीक्षा दहावी, बारावी, पदवी आदी सर्व शैक्षणिक स्तरातील उमेदवारांसाठी असणार आहे. वेगवेगळ्या योग्यतेच्या उमेदवारांची वेगवेगळ्या कॉम्प्युटर आधारीत परीक्षा होतील. ज्यामध्ये बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील.