Top Recommended Stories

Street View Feature: गूगल मॅपमध्ये आले स्ट्रीट व्ह्यू फीचर, भारताच्या 10 शहरांतील रस्त्यांचा मिळेल 360 डिग्री व्ह्यू

Street View Feature: गूगलने म्हटले की, या वर्षाच्या अखेरीपर्यंत स्ट्रीट व्ह्यू फीचर भारताच्या अजून 50 शहरांमध्ये सुरु केले जाईल.

Updated: July 28, 2022 2:19 PM IST

By India.com News Desk | Edited by Mohini Vaishnav

गूगल मॅपमध्ये आले स्ट्रीट व्ह्यू फीचर, भारताच्या 10 शहरांतील रस्त्यांचा मिळेल 360 डिग्री व्ह्यू
गूगल मॅपमध्ये आले स्ट्रीट व्ह्यू फीचर, भारताच्या 10 शहरांतील रस्त्यांचा मिळेल 360 डिग्री व्ह्यू

Street View Feature: टेक कंपनी गूगल नेहमीच यूजर्ससाठी अ‍ॅप्समध्ये नवीन फीचर्स आणत असते. प्ले स्टोअर(Play Store), यूट्यूब (Youtube), पेमेंट अ‍ॅप (Payment App)सह अनेक अ‍ॅप्समध्ये नवीन अपडेट वेळोवेळी येत राहतात. आता यामध्ये गूगलने आपल्या मॅप्स (Google Maps) अ‍ॅपमध्ये एक नवीन स्ट्रीट व्ह्यू फीचर जोडले आहे. गुगलने भारतात गुगल स्ट्रीट व्ह्यू फीचर लाँच केल्याने लोक आता लँडमार्क शोधू शकतील आणि घरी बसून कोणतेही ठिकाण किंवा रेस्टॉरंट एक्सपीरियन्स करु शकतील. गूगल मॅप आता स्थानिक वाहतूक पोलिसांच्या मदतीने स्पीड लिमिट, बंद रस्ते आणि चालू असलेले काम आणि चांगले ट्रॅफिक लाइट दर्शविण्यात देखील मदत करेल. या फीचरची खूप दिवसांपासून प्रतीक्षा होती. कंपनीने हे 15 वर्षांपूर्वी अमेरिकेत लॉन्च केले होते.

आतापर्यंत गुगल मॅपवर (Google Maps) सॅटेलाइट फोटो असायचे, पण आता त्यावर खरी छायाचित्रे असतील. Google चे नवीन स्ट्रीट व्ह्यू फीचर, यूजर्सला शहरातील रस्ते आणि सार्वजनिक स्थानांचे 360-डिग्री व्ह्यू दाखवते. या नवीन फीचरच्या मदतीने, यूजर्स आता कोणत्याही ठिकाणाचा लँडमार्क घरी बसून शोधू शकतील किंवा कोणत्याही ठिकाणाचा किंवा रेस्टॉरंटचा प्रत्यक्ष अनुभव घेऊ शकतील. मात्र, सध्या ही सेवा भारतातील एकूण 10 शहरांमध्ये सुरू होणार आहे. गुगलने घोषणा केली आहे की आज स्ट्रीट व्ह्यू फीचर (Street View) भारतात आणले गेले आहे.

You may like to read

Street View फीचर कोणत्या शहरात रोलआउट

गुगलने सांगितले आहे की, या वर्षाच्या अखेरीस आणखी 50 शहरांमध्ये स्ट्रीट व्ह्यू फीचर सुरू केले जाईल. कंपनीने जारी केलेल्या निवेदनात, स्ट्रीट व्ह्यू फीचर आजपासून गुगल मॅपवर दिसेल. सध्या ते फक्त बंगळुरुमध्ये उपलब्ध आहे. यानंतर हे फीचर कोलकाता आणि हैदराबादमध्ये रिलीज केले जाईल. काही काळानंतर चेन्नई, दिल्ली, मुंबई, पुणे, नाशिक, वडोदरा, अहमदनगर आणि अमृतसरसह भारतातील आणखी शहरांमध्ये देखील रोल आउट केले जाईल.

असा करा Street View चा वापर

लोकांना या फीचरचा वापर करणे खूप सोपे होईल, असे कंपनीकडून सांगण्यात आले. ते वापरण्यासाठी, पहिले तुम्हाला Google मॅप अ‍ॅप उघडावे लागेल. यानंतर, कोणत्याही शहरातील रस्त्यावर झूम इन करा आणि त्या एरियाच्या नावावर टॅप करावे लागेल. याच्या मदतीने लोक कॅफे आणि कल्चरल हॉटस्पॉट सेंटर्सविषयी माहिती घेऊ शकतील.

Also Read:

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.

?>