Swami Vivekananda Jayanti: नरेंद्रनाथ होते बालपणीचे नाव, असे बनले स्वामी विवेकानंद, जाणून घ्या या रंजक गोष्टी

स्वामी विवेकानंद हे तरुणांसाठी प्रेरणास्थान आहेत. ते त्यांना पुढे जाण्यासाठी आणि जीवनात यश मिळविण्यासाठी प्रेरणा देतात. त्यामुळेच त्यांचा वाढदिवस युवा दिन म्हणून साजरा केला जातो. स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी कोलकाता येथे झाला.

Updated: January 12, 2022 8:43 AM IST

By India.com News Desk | Edited by Chandrakant Jagtap

Swami Vivekananda Jayanti: नरेंद्रनाथ होते बालपणीचे नाव, असे बनले स्वामी विवेकानंद, जाणून घ्या या रंजक गोष्टी
Swami Vivekananda Jayanti

Swami Vivekananda Jayanti: स्वामी विवेकानंद हे तरुणांसाठी प्रेरणास्थान आहेत. ते त्यांना पुढे जाण्यासाठी आणि जीवनात यश मिळविण्यासाठी प्रेरणा देतात. त्यामुळेच त्यांचा वाढदिवस युवा दिन (Youth Day) म्हणून साजरा केला जातो. स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी (Swami Vivekananda Birth Anniversary) कोलकाता येथे झाला. पण लहानपणापासून त्यांचे नाव विवेकानंद नव्हते. जन्मानंतर त्यांचे नाव नरेंद्रनाथ दत्त ठेवण्यात आले. त्यानंतर त्यांचे नाव स्वामी विवेकानंद पडले.

Also Read:

स्वामी विवेकानंद नाव कसे पडले?

बहुतेक लोकांचा असा विश्वास आहे की हे नाव त्यांना त्यांचे गुरू रामकृष्ण परमहंस यांनी दिले होते. पण हे नाव त्याच्या गुरूंनी दिलेले नसून दुसऱ्याने दिले आहे. स्वामीजींना अमेरिकेला जायचे होते. मात्र यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते. त्यांच्या संपूर्ण प्रवासाचा खर्च राजपुतानाच्या खेत्री राजाने उचलला आणि स्वामीजींना स्वामी विवेकानंद (Swami Vivekananda Name) हे नावही दिले. याचा उल्लेख प्रसिद्ध फ्रेंच लेखक रोमेन रोलँड यांनीही त्यांच्या ‘द लाइफ ऑफ विवेकानंद अँड द युनिव्हर्सल गॉस्पेल’ या पुस्तकात केला आहे. 1891 मध्ये शिकागो येथे झालेल्या जागतिक धर्म संसदेला जाण्यासाठी स्वामीजींनी राजाच्या सांगण्यावरूनच हे नाव स्वीकारले.

विवेकानंदांनी जेव्हा अमेरिकेत झालेल्या धर्म संसदेत त्यांचे हिंदी भाषण सुरू केले तेव्हा त्यांनी प्रत्येकाचे मन जिंकले होते. त्यांच्या भाषणानंतर शिकागोच्या आर्ट इन्स्टिट्यूटमध्ये 2 मिनिटे टाळ्यांचा कडकडाट झाला. ते भाषण आजही स्मरणात आहे. या प्रसंगातून स्वामी विवेकानंदांना वेगळी ओळख मिळाली. चला जाणून घेऊया स्वामी विवेकानंदांशी संबंधित काही रंजक गोष्टी.

स्वामी विवेकानंदांशी संबंधित काही रंजक गोष्टी:

  1. स्वामी विवेकानंदांचे नाव नरेंद्रनाथ दत्त होते. ते सुरुवातीपासून योगी स्वभावाचे होते आणि लहानपणापासून ते ध्यान करत असत. त्यांचा जन्म आर्थिकदृष्ट्या संपन्न कुटुंबात झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त होते. ते व्यवसायाने वकील होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अतिशय चांगली कामगिरी केली. त्यांच्या आईचे नाव भुवनेश्वरी देवी होते.
  2. स्वामी विवेकानंद हे लहान असतानाच त्याच्या डोक्यावरील पितृछत्र हरपले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती डबघाईला आली. बऱ्याचदा तर स्वामी विवेकानंद यांना दिवसातून एकदाच जेवन मिळत असे.
  3. स्वामी विवेकानंद यांच्या वडिलांचे बालपणीच निधन झाले होते. त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती कमकुवत झाली होती. स्वामी विवेकानंद अनेकदा कुटुंबाला अधिक अन्न मिळावे यासाठी दुपारचे जेवण जेवले नाहीत.
  4. स्वामी विवेकानंदांनी विविध क्षेत्रांतून दैवी प्रभाव मागितला होता. 1880 मध्ये त्यांनी ब्राह्मो समाजाचे संस्थापक आणि रवींद्रनाथ टागोर यांचे वडील देबेंद्रनाथ टागोर यांची भेट घेतली. जेव्हा त्यांनी टागोरांना विचारले की त्यांनी देव पाहिला आहे का तेव्हा देबेंद्रनाथ टागोरांनी उत्तर दिले “मुला, तुच्याकडे योगीचे डोळे आहेत.”
  5. देवाशी संबंधित प्रश्नांमध्ये नरेंद्रनाथांना कोणीही मदत करू शकत नव्हते. 1881 मध्ये जेव्हा ते रामकृष्ण परमहंसांना भेटले तेव्हा त्यांनी रामकृष्णांना हाच प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी उत्तर दिले “होय मी पाहिले आहे, मी तुम्हाला जितके स्पष्टपणे पाहू शकतो तितकेच मी देवाला पाहू शकतो. फरक एवढाच आहे की मी त्यांना तुमच्यापेक्षा जास्त खोलवर अनुभवू शकतो”. रामकृष्ण परमहंसजींच्या या उत्तराने विवेकानंदांच्या जीवनावर खोलवर ठसा उमटवला होता.
  6. लायब्ररीतून अनेक पुस्तके घेऊन ते दुसऱ्या दिवशी परत करत असे. ही प्रक्रिया अनेक दिवस चालू राहिली आणि ग्रंथपालांना (librarian) नेहमी प्रश्न पडत असे की स्वामीजींनी ते वाचले आहे की नाही.
  7. स्वामी विवेकानंद यांच्या जन्मदिनी दरवर्षी 12 जानेवारी रोजी भारतात ‘राष्ट्रीय युवा दिन’ साजरा केला जातो. याची सुरुवात 1985 पासून झाली होती.
  8. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की स्वामी विवेकानंदांना त्यांच्या तरुणपणात दमा आणि शुगरसारखे आजार होते. स्वामी विवेकानंदांनीही भाकीत केले होते की हा आजार आपल्याला 40 वर्षेही जगू देणार नाही. स्वामी विवेकानंद फक्त 39 वर्षांचे होते तेव्हा (4 जुलै 1902) त्यांचे निधन झाले.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 12, 2022 7:00 AM IST

Updated Date: January 12, 2022 8:43 AM IST