नवी दिल्ली: दिल्ली पोलिसांनी 6 संशयित दहशतवाद्यांना अटक (6Terrorists Arrested) केली आहे. हे दहशतवादी देशातील अनेक ठिकाणी हल्ले करण्याची योजना आखत होते, असा दावा दिल्ली पोलिसांनी केला आहे. यातील दोघे पाकिस्तानशी संबंधित (Pakistani Terrorists) आहेत. दिल्ली पोलिसांनुसार अटक करण्यात आलेल्या 6 पैकी 2 जणांनी पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI कडून ( ISI Terrorists) प्रशिक्षण घेतले आहे. तसेच त्यांचा अंडरवर्ल्डशी (Underworld) देखील संबंध आहे. या सर्वांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि स्फोटकेही जप्त करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. (Terrorists Arrested: six Arrested Terrorists Including Two Pakistani Terrorists; Major action by Delhi Police)Also Read - Terror Module Busted: मुंबई लोकलमध्ये विषारी गॅसचा हल्ला करण्याचा होता दहशतवाद्यांचा प्लॅन, चौकशीतून माहिती उघड!

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने यूपी एटीएससह प्रयागराजवर (Prayagraj) छापा टाकून या सर्वांना पकडले आहे. प्रयागराजच्या करेलीमध्ये हे लोक उपस्थित होते. दिल्ली पोलिसांनुसार हे सर्वजण देशात दहशतवादी कारवाया करण्याचा कट रचत होते. तसेच अनेक प्रसिद्ध व्यक्तींना देखील लक्ष्य केले जाणार होते. देशातील वातावरण खराब कराण्याचा त्यांचा उद्देश होता. Also Read - Terror Module: मुंबईच्या जोगेश्वरीमधून सातवा संशयित दशतवादी ताब्यात, महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई

Also Read - Terror Module: दहशतवादी हल्ल्यांचा कट उधळला, नवरात्रीदरम्यान तेलाच्या टँकरचा करणार होते स्फोट!

दिल्ली पोलिसांनी म्हटले की, “यातील दोन दहशतवादी पाकिस्तानातून प्रशिक्षित आहेत (two terrorists are trained from Pakistan) आणि त्यांना तेथून येथे पाठवण्यात आले आहे. त्यांना संपूर्ण नियोजनासह भारतात पाठवण्यात आले.” दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलचे अधिकारी नीरज ठाकूर यांनी सांगितले की, “त्यांचे अनेक बंगाली भाषिक गटांशीही संबंध होते. या लोकांना सीमेपलीकडून निर्देशित केले जात असल्याचे समोर आले आहे.”

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या लोकांनी दोन टीम बनवल्या होत्या. ते दाऊद इब्राहिमचा भाऊ अनीस इब्राहिमच्या संपर्कात होते. त्याच्याकडेच यांना शस्त्रे पुरवण्याची जबाबदारी होती. तर दुसरी टीम त्यांना हवालाच्या माध्यमातून फंडिग उपलब्ध करून देत ​​होती. (Terrorists Arrested: six Arrested Terrorists Including Two Pakistani Terrorists; Major action by Delhi Police)