नवी दिल्ली : देशात डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे (Delta Plus Variant) पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. डेल्टा प्लसच्या रुग्णसंख्येत वाढ होत चालली आहे. नॅशनल सेंटर फॉर डिसिज कंट्रोलचे (NSDC) संचालक डॉ. एस. के सिंह यांनी सांगितले की, आतापर्यंत देशामध्ये डेल्टा प्लसचे 48 रुग्ण आढळले आहेत. देशातील 8 राज्यांना जास्त सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. या राज्यांमध्ये डेल्टा प्लस व्हेरिएंटचे 50 टक्क्यांपेक्षा अधिक प्रकरणं समोर आली आहेत. या राज्यांमध्ये आंध्रप्रदेश (Andhra Pradesh), दिल्ली (Delhi), हरियाणा (Haryana), केरळ (Keral), महाराष्ट्र (Maharashtra), पंजाब (Punjab), तेलंगणा (telangana) आणि पश्चिम बंगालचा (West Bengal) समावेश आहे.’Also Read - Aadhaar-PAN Link : आधार-पॅन लिंक केले नसेल तर लवकर करा, 30 जूननंतर द्यावे लागतील 1000 रुपये!

डॉ. एस. के सिंह (Dr. S K Singh) यांनी सांगितले की, ‘देशामध्ये 45 हजार नमुन्यांपैकी 48 रुग्णांमध्ये डेल्टा प्लस व्हेरिएंट आढळला आहे. डेल्टा प्लसचे सर्वात जास्त 20 रुग्ण महाराष्ट्रात आहेत. त्यानंतर तामिळनाडूमध्ये नऊ रुग्ण, मध्य प्रदेशमध्ये सात, केरळमध्ये तीन, पंजाब आणि गुजरातमध्ये प्रत्येकी दोन रुग्ण आढळले आहेत. तर ओडिशा, राजस्थान, जम्मू-काश्मीर, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमध्ये प्रत्येकी एक एक रुग्ण आढळला आहे. Also Read - Rohit Sharma Tested Covid Positive: इंग्लंडविरुद्ध पाचव्या कसोटीपूर्वी कर्णधार रोहित शर्माला कोरोनाची लागण

केंद्र सरकारने (Central Government) सांगितले की, ‘भारतात कोरोनाचे 90 टक्के प्रकरणं बी.1.617.2 (डेल्टा) स्वरूपात आहेत. 35 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 174 जिल्ह्यांमध्ये कोरोनाची (Coronavirus) चिंताजनक प्रकरणं समोर आली आहेत. यामध्ये सर्वात जास्त कोरोना रुग्ण महाराष्ट्र, दिल्ली, पंजाब, तेलंगणा, पश्चिम बंगाल आणि गुजरातमध्ये सापडले.’ तसंच, कोरोनाच्या चिंताजनक स्वरुपाच्या घटनांचे प्रमाण मे 2021मध्ये 10.31 टक्क्यांवरुन जून 2021मध्ये 51 टक्क्यांपर्यंत वाढले.’, असं देखील सांगितले. Also Read - Corona Vaccine for Children: आनंदवार्ता! 7 ते 11 वयोगटातील मुलांचे लवकरच लसीकरण, या लसीच्या वापराला मिळाली मंजुरी

आयसीएमआरचे महासंचालक बलराम भार्गव यांनी (ICMR Director General Balram Bhargava) सांगितले की, ‘सध्याची लस कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटवर किती परिणामकारक आहे हे येत्या 7 ते 10 दिवसांमध्ये समजेल. तसंच, कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन हे कोरोनाच्या SARS CoV 2 – अल्फा, बीटा, गामा आणि डेल्टा या व्हेरिएंटविरोधात काम करतात. सध्या डेल्टा प्लस व्हेरिएंट जगभरातील 12 देशांमध्ये आहेत. भारतात 48 प्रकरणांची ओळख पटली आहे. पण यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे अधिक रुग्ण हे स्थानिक आहेत.’