Top Recommended Stories

National Highwayवरुन प्रवास महागणार, 10 ते 15 टक्क्यांनी टोल टॅक्समध्ये वाढ!

Toll Price Hike: भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने टोल टॅक्समध्ये 10 ते 15 टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळे 1 एप्रिलपासून तुमचा नॅशनल हायवेवरुन प्रवास करणे महागणार आहे. टोल टॅक्स रेट आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहेत.

Updated: March 31, 2022 5:00 PM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

Toll Plaza
Toll Plaza

Toll Price Hike: नॅशनल हायवेवरुन (National Highway) प्रवास करणे आज मध्यरात्रीपासून महाग होणार आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने (National Highways Authority) टोल टॅक्समध्ये 10 ते 15 टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळे 1 एप्रिलपासून तुमचा नॅशनल हायवेवरुन प्रवास करणे महागणार आहे. टोल टॅक्स रेट (Toll Tax Rate) आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहेत.

नॅशनल हायवेवरुन प्रवास करणे आज मध्यरात्रीपासून महागणार आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने टोल टॅक्समध्ये 10 रुपये ते 65 रुपयांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. छोट्या वाहनांसाठी लागणाऱ्या टोल टॅक्समध्ये 10 ते 15 रुपयांनी तर कमर्शियल वाहनांसाठी लागणाऱ्या टोल टॅक्समध्ये 65 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे एक एप्रिलपासून नॅशनल हायवेवरुन प्रवास करताना तुमच्या खिशाला आणखी कात्री लागणार आहे. महागाईच्या काळामध्ये सर्वसामान्यांना हा आणखी एक धक्का आहे.

You may like to read

एनएचएआयचे (NHAI) देशभरात जवळपास 386 हायवे आहेत. या हायवेवर असलेल्या टोल प्लाझावर (Toll Plaza) वाहनांकडून वेगवेगळ्या श्रेणींप्रमाणे टोल टॅक्स घेतला जातो. एनएचएआयकडून यावर्षी एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला टोल प्लाझाची रेट लिस्टमध्ये बदल करण्यात आला आहे. त्यामुळे आज मध्यरात्रीपासून नवे दर लागू होतील त्यानुसारच वाहन चालकांना नॅशनल हायवेवरुन प्रवास करताना अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. यावेळीसुद्धा एनएचएआयने टोल प्लाझावर दोन ते तीन टक्क्यांनी वाढ केली आहे. पण काही ठिकाणी यापेक्षा जास्त किंवा कमी वाढ असू शकते.

दरम्यान, टोल मासिक पास काढताना देखील जास्त पैसे मोजावे लागणार आहे. टोल टॅक्स पास तयार करण्यासाठी निर्धारित सेट लिस्टनुसार दोन ते तीन टक्के जास्त पैसे द्यावे लागणार आहे. काही टोल प्लाझावर नवीन रेट लिस्ट जारी करण्यात आली आहे. तर काही ठिकाणी आधीपासूनच रेट लिस्ट पाठवण्यात आली आहे. 31 मार्चच्या मध्यरात्रीपासून नवीन रेट लिस्ट लागू होणार आहे.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.