Top Recommended Stories

TRAI orders to telecom companies : आता 30 दिवसांची असेल रिचार्ज validity, 'ट्राय'चे टेलीकॉम कंपन्यांना महत्त्वाचे आदेश

TRAI orders to telecom companies: टेलीकॉम रेग्यूलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाने सर्व दूरसंचार कंपन्यांना आज (27 जानेवारी) नवीन आणि महत्त्वाचे आदेश जारी केले आहेत. TRAI ने दिलेले हे आदेश ऐकूण टेलिकॉम सुविधा वापरणाऱ्या ग्राहकांना आनंद होईल.

Published: January 28, 2022 6:50 PM IST

By India.com News Desk | Edited by Chandrakant Jagtap

TRAI

TRAI orders to telecom companies: टेलीकॉम रेग्यूलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाने (TRAI) सर्व दूरसंचार कंपन्यांना (Telecom Company) आज (27 जानेवारी) नवीन आणि महत्त्वाचे आदेश जारी केले आहेत. TRAI ने दिलेले हे आदेश ऐकूण टेलिकॉम (Telecom Company) सुविधा वापरणाऱ्या ग्राहकांना आनंद होईल. प्रिप्रेड रिचार्ज प्लॅनच्या किमती (Prepaid Plan Validity) वाढल्यानंतर ग्राहकांनी टेलिकॉम कंपन्यांवर (Reliance Jio) प्रचंड नाराजी व्यक्त केली होती. अशा परिस्थितीत आता TRAI ने टेलिकॉम कंपन्यांना (Airtel) दिलेल्या आदेशामुळे (Vodafone Idea) ग्राहाकांना दिलासा मोठा दिलासा मिळणार आहे. TRAI ने Telecom Tariff (66th Amendment) Order, 2022 अंतर्गत नवीन निर्णय घेतले आहेत. त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया…

Also Read:

TRAI ने टेलिकॉम कंपन्यांना Telecom Tariff (66th Amendment) Order, 2022 अंतर्गत नवीन आदेश दिले आहेत. TRAI च्या आदेशानुसार दूरसंचार कंपनी किमान एक प्लॅन, एक स्पेशल टॅरिफ व्हाउचर आणि एक कॉम्बो व्हाउचर असे ठेवेल ज्याची वैधता एक महिन्यासाठी असेल. कारण आत्तापर्यंत दूरसंचार कंपन्याकडून एका महिन्याच्या नावाखाली 28 दिवसांची वैधता असलेले प्लॅन दिले जात होते. मात्र आता ट्रायने निर्णय घेतला आहे की या प्लॅनची ​​वैधता 28 दिवस नाही तर पूर्ण 30 दिवसांची असेल. यासोबतच जर ग्राहकाला चालू प्लॅन पुन्हा रिचार्ज करायचा असेल तर तो सध्याच्या प्लॅनच्या तारखेपासून करू शकेल अशी तरतूद असावी असे ट्रायने म्हटले आहे.

You may like to read

आता नाराज होणार नाहीत ग्राहक

बऱ्याच काळापासून ग्राहकांच्या टेलिकॉम कंपन्यांसंदर्भात काही तक्रारी होत्या की कंपन्या संपूर्ण महिना प्लान देत नाहीत. तसेच प्लानची वैधता 30 दिवसांऐवजी 28 दिवसच आहे आणि प्लॅन एका महिन्याच्या रूपात विकला जातो. मात्र TRAI च्या नव्या आदेशानंतर आता ग्राहकांच्या या तक्रारी दूर होणार आहेत.

ग्राहकांना मिळतील अनेक सुविधा

ट्रायने दूरसंचार कंपन्यांना सूचना दिल्या आहेत की त्यांना त्यांच्या प्लॅनची ​​वैधता महिनाभर ठेवावी लागेल. प्रत्येक कंपनीच्या प्लॅनमध्ये, एक विशेष व्हाउचर, कॉम्बो व्हाउचर पूर्ण महिन्याच्या वैधतेसाठी (validity) ठेवावे लागेल. Telecom Tariff (66th Amendment) आदेश 2022 जारी केल्यानंतर आता दूरसंचार कंपन्यांच्या सर्व ग्राहकांना अनेक प्लॅनचे पर्याय आणि प्लॅनमध्ये पूर्ण 30 दिवसांच्या वैधतेचा पर्याय मिळेल.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 28, 2022 6:50 PM IST