नवी दिल्ली : राष्ट्रीय पात्रता परीक्षा म्हणजेच नेट परीक्षा (NET Exam 2021) पुढे ढकलण्यात आल्या असून नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून (National Testing Agency) नवीन तारखा जाहीर करण्यात आल्या आहे. नेट परीक्षेचे (NET Exam) आयोजन 6 ऑक्टोबर ते 11 ऑक्टोबर दरम्यान करण्यात आले होते. पण नॅशनल टेस्टिंग एजन्सीने या तारखांमध्ये बदल करत नवीन तारखा जाहीर केल्या आहेत. नवीन वेळापत्रकानुसार, या परीक्षा 6 ते 8 ऑक्टोबर आणि 17 ते 19 ऑक्टोबर दरम्यान घेण्यात येणार आहे. कोरोनामुळे (Corona Virus) यावर्षीच सर्वच परीक्षांच्या वेळापत्रकांमध्ये बदल करण्यात आले आहेत.Also Read - JEE Main Admit Card 2021 Released: JEE Main 2021 च्या चौथ्या सत्राचे Admit Card जारी, असे करा डाउनलोड करा

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने जाहीर केलेल्या नवीन वेळापत्रकानुसार, नेटची परीक्षा दोन सत्रांमध्ये (two sessions) घेण्यात येणार आहे. सकाळी 9 ते दुपारी 12 या दरम्यान एका बॅचची परीक्षा होईल तर दुपारी 3 ते संध्याकाळी 6 या दरम्यान दुसऱ्या बॅचची परीक्षा होईल. 10 ऑक्टोबर रोजी इतर परीक्षा असल्यामुळे विद्यार्थ्यांसमोर अनेक अडचणी उभ्या राहिल्या होत्या. याबाबत त्यांनी नॅशनल टेस्टिंग एजन्सीला विनंती केली होती. त्यानंतर नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) नेट परीक्षांच्या तारखांच पुढे ढकलत विद्यार्थ्यांना दिलासा दिला. Also Read - UGC NET 2021 Exam: नेट 2021 परीक्षेच्या तारखा जाहीर, जाणून घ्या कसा करावा अर्ज

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने यापूर्वी नेट परीक्षेसाठी अर्ज मागवले होते. त्यावेळी ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले नव्हते त्यांच्यासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीने पुन्हा एकदा अर्ज करण्याची संधी दिली. पात्र विद्यार्थी 6 सप्टेंबर 2021 पर्यंत अर्ज दाखल करू शकतात असे एनटीएने सांगितले होते. तर, 7 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर दरम्यान अर्जामध्ये दुरुस्तीची विंडो (Repair window) सुरू राहील, असे देखील सांगण्यात आले होते. दरम्यान, कोरोनामुळे (Covid-19) डिसेंबर 2020मध्ये होणारी परीक्षा उशिरा होत आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने डिसेंबर 2020 आणि जून 2021या दोन्ही परीक्षा जोडून एकत्र परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता. Also Read - NEET 2021 Date Announced: ठरलं! 12 सप्टेंबरला होणार NEET परीक्षा; उद्यापासून अर्ज प्रक्रिया सुरू