Ukraine Russia Crisis: युक्रेनबाबत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची आपत्कालीन बैठक, भारतानेही जारी केले निवेदन
Ukraine Russia Crisis: रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनबाबत केलेल्या घोषणेनंतर निर्माण झालेली तणावपूर्ण परिस्थिती पाहता संयुक्त राष्ट्रांनी सुरक्षा परिषदेची तातडीची बैठक बोलावली आहे. आता या बैठकीनंतर या मुद्द्यावर एक खुली बैठक होणार आहे, ज्यात भारतही निवेदन देणार आहे.

Ukraine Russia Crisis: रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी युक्रेनबाबत केलेल्या घोषणेनंतर निर्माण झालेली तणावपूर्ण परिस्थिती पाहता संयुक्त राष्ट्रांनी सुरक्षा परिषदेची (United Nation Security Council) तातडीची बैठक बोलावली आहे. आता या बैठकीनंतर या मुद्द्यावर एक खुली बैठक होणार आहे, ज्यात भारतही निवेदन देणार (India statement) आहे. मिळालेल्या माहितीनुसार अमेरिका आणि फ्रान्सने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची (UNSC) तातडीची बैठक बोलावण्याचे आवाहन केले होते. आता या मुद्द्यावर खुली बैठक होणार आहे. भारतानेही रशियाबाबत निवेदन जारी केले आहे..
Also Read:
- Jaishankar on Terrorism: जयशंकर यांनी पाक आणि चीनला सुनावले, म्हणाले - दहशतवादाचे केंद्र जगाने ओळखलेय!
- Russia Ukraine War : रशियचा युक्रेनवर आतापर्यंत सर्वात मोठा हल्ला, 75 क्षेपणास्त्रं डागली; 11 ठार!
- SCO Summit 2022: उझबेकिस्तानमध्ये शिखर परिषदेस सुरुवात, पंतप्रधान मोदी घेणार रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची भेट!
भारताने चिंता व्यक्त केली
युक्रेनवरील यूएनएससीच्या बैठकीत (UNSC meeting) संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी टीएस तिरुमूर्ती (T. S. Tirumurti) म्हणाले की, युक्रेन-रशियाच्या सीमेवर वाढणारा तणाव हा गंभीर चिंतेचा विषय आहे. या घडामोडींमध्ये प्रदेशातील शांतता आणि सुरक्षा बिघडवण्याची क्षमता आहे. आम्ही सर्व पक्षांना संयम बाळगण्याचे आवाहन करतो. राजनयिक संवादातूनच हा प्रश्न सोडवला जाऊ शकतो असा आमचा विश्वास आहे. नागरिकांची सुरक्षा महत्त्वाची आहे. 20 हजारांहून अधिक भारतीय विद्यार्थी आणि नागरिक युक्रेनच्या विविध भागात आणि सीमावर्ती भागात राहतात आणि शिकतात. भारतीयांच्या सुरक्षेला आमचे प्राधान्य असल्याचे ते म्हणाले.
रशियाची पूर्व युक्रेनमधील डोनेस्तक आणि लुहान्स्कस प्रांतांना स्वतंत्र देश म्हणून मान्यता
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी पूर्व युक्रेनमधील रशिया-समर्थित फुटीरतावादी भागांना (डोनेत्स्क आणि लुहान्स्क) स्वतत्र्य देश (independent states) म्हणून मान्यता दिली आहे. युक्रेनवर रशियाच्या हल्ल्याची पाश्चात्य भीती असतानाच पुतिन यांच्या निर्णयामुळे तणाव (Ukraine Russia tensions) आणखी वाढणार आहे. त्यामुळे पाश्चात्य देशांना रशिया युक्रेनवर केव्हाही हल्ला करू शकतो आणि हल्ल्याचे निमित्त म्हणून पूर्व युक्रेनमधील संघर्षाचा वापर करू शकतो अशी भीती आहे.
जाणून घ्या डोनेस्तक आणि लुहान्स्क बद्दल
डोनेस्तक (Donetsk) आणि लुहान्स्क (Luhansk) ही युक्रेनची दोन महत्त्वाची राज्ये आहेत. या दोन्ही राज्यांच्या सीमा रशियालाही लागून आहेत. ही दोन राज्ये युक्रेन आणि रशिया या दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावाचे मुख्य कारण आहेत. सोव्हिएत युनियनच्या विघटनाचे हे क्षेत्र युक्रेनच्या अखत्यारीत आले, तर रशिया त्यावर आपले वर्चस्व असल्याचे मानतो. ही दोन्ही राज्ये खनिज संपत्तीचे प्रचंड मोठे स्रोतही मानली जातात. आता रशियाने दोन्ही भागात रशियन सैन्य पाठवण्याचे आदेश दिले आहेत.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या