मुंबई : बँकेमध्ये नोकरी मिळवण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे. युनियन बँकेमध्ये विविध पदांसाठी बंपर भरती निघाली आहे. युनियन बँकेच्या मुंबई स्थित मुख्यालयातून ही भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार (Union Bank Recruitment 2021) ज्यांना या पदासाठी अर्ज करायचा आहे (Union Bank Recruitment 2021) ते युनियन बँकेच्या अधिकृत वेबसाइट unionbankofindia.co.in वर भेट देऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया (Union Bank Recruitment 2021) 12 ऑगस्ट 2021 पासून सुरू झाली आहे. 3 सप्टेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.Also Read - BMC Recruitment 2021: बृहन्मुंबई महानगरपालिकेत वैद्यकीय विभागात नोकरीची संधी; लगेच करा अर्ज

या व्यतिरिक्त https://ibpsonline.ibps.in/ubirscoaug21/ या लिंकवर क्लिकवर जाऊन उमेदवार (Union Bank Recruitment 2021) या पदांसाठी थेट अर्ज करू शकतात. तसेच https://testchampion.jagranjosh.com/free-pdf-page?file=union-bank-so-notification.pdf या लिंकवर जाऊन उमेदवार भरती संदर्भातील अधिकृत अधिसूचना (Union Bank Recruitment 2021) देखील पाहू शकतात. या भरती प्रक्रियेअंतर्गत (Union Bank Recruitment 2021) एकूण 347 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. ही भरती एमएमजीएस -3 आणि एमएमजीएस -2 आणि एमएमजीएस -1 ग्रेड अंतर्गत करण्यात येणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना युनियन बँकेच्या कुठल्याही शाखेत नियुक्त करण्यात येणार आहे. Also Read - RRB Recruitment 2021: भारतीय रेल्वेमध्ये मेगाभरती, 10 वी उत्तीर्ण तरुणांना मोठी संधी

महत्वाच्या तारखा –

ऑनलाईन अर्ज सुरू झालेली तारीख – 12 ऑगस्ट 2021
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 3 सप्टेंबर 2021 Also Read - Shikshan Sevak Recruitment: राज्यातील 2,062 रिक्त जागांवर शिक्षण भरती, 3,902 उमेदवारांची होणार मुलाखत: शिक्षणमंत्री

रिक्त जागा –

सिनियर मॅनेजर (रिस्क) – 60 पदं

मॅनेजर (रिस्क) – 60 पदं

मॅनेजर (सिव्हिल इंजिनिअर) – 7 पदं

मॅनेजर (आर्किटेक्ट) – 7 पदं

मॅनेजर (इलेक्ट्रिकल इंजिनिअर) – 2 पदं

मॅनेजर (प्रिंटिंग टेक्नॉलॉजिस्ट) – 1 पदं

मॅनेजर (फॉरेस्क) – 50 पदं

मॅनेजर (सीए) – 14 पदं

असिस्टंट मॅनेजर (टेक्निकल ऑफिसर) – 26 पदं

असिस्टंट मॅनेजर (फॉरेक्स) – 120 पदं

शैक्षणिक पात्रता –

सिनियर मॅनेजर (रिस्क) – ग्लोबल असोसिएशन ऑफ रिस्कमधून फायनान्शियल रिस्क मॅनेजमेंटमध्ये सर्टिफिकेशन किंवा प्रीमा इन्स्टिट्यूटमधून प्रोफेशनल रिस्क मॅनेजमेंटमध्ये सर्टिफिकेशन

मॅनेजर (रिस्क) – ग्लोबल असोसिएशन ऑफ रिस्कमधून फायनान्शियल रिस्क मॅनेजमेंटमध्ये सर्टिफिकेशन किंवा प्रीमा इन्स्टिट्यूटमधून प्रोफेशनल रिस्क मॅनेजमेंटमध्ये सर्टिफिकेशन

मॅनेजर (सिव्हिल इंजिनिअर) – ग्लोबल असोसिएशन ऑफ रिस्कमधून फायनान्शियल रिस्क मॅनेजमेंटमध्ये सर्टिफिकेशन किंवा प्रीमा इन्स्टिट्यूटमधून प्रोफेशनल रिस्क मॅनेजमेंटमध्ये सर्टिफिकेशन

मॅनेजर (आर्किटेक्ट) – आर्किटेक्टमध्ये बॅचलर डिग्री किमान 60 टक्के गुणांसह.

मॅनेजर (इलेक्ट्रिकल इंजिनिअर) – इलेक्ट्रकल इंजिनिअरिंगमध्ये किमान 60 टक्के गुणांसह बीई/बी टेक

मॅनेजर (प्रिंटिंग टेक्नॉलॉजिस्ट) – प्रिटिंग टेक्नॉलॉजीमध्ये बीई किंवा बीटेक.

मॅनेजर (फॉरेस्क) – फुल टाइम एमबीए कोर्स.

मॅनेजर (सीए) – सीएची पदवी.

असिस्टंट मॅनेजर (टेक्निकल ऑफिसर) – सिव्हिल/ इलेक्ट्रिकल / मॅकॅनिकल/ प्रॉडक्शन/ मेटलर्जी/ इलेक्ट्रॉनिक्स पैकी कुठल्याही विषयातून इंजिनिअरिंगची पदीवी

असिस्टंट मॅनेजर (फॉरेक्स) – फूल टाइम एमबीएची पदवी.

वयोमर्यादा –

– सिनियर मॅनेजर – 30 ते 40 वर्षे

– मॅनेजर – 25 ते 35 वर्षे

– असिस्टंट मॅनेजर – 20 ते 30 वर्षे

अर्जासाठी शुल्क –

सर्वसामान्य, ईडब्ल्यूएस आणि ओबीसी उमेदवारांसाठी अर्ज शुल्क – 850 रुपये

एससी / एसटी / पीडब्ल्यूडी उमेदवारांना अर्ज शुल्क नाही.