Top Recommended Stories

Union Budget 2022: Android मोबाईल आणि iPhoneवर सुद्धा पाहू शकता लाईव्ह, असं डाऊनलोड करा हे अ‍ॅप!

Union Budget 2022: अर्थसंकल्प पाहण्यासाठी अर्थसंकल्प मंत्रालयाने एक मोबाइल अ‍ॅप आणलं आहे. हे मोबाईल अ‍ॅप अ‍ॅड्रॉईड आणि आयओएस दोन्ही युजर्ससाठी उपलब्ध आहे.

Updated: January 29, 2022 5:11 PM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

Union Budget 2022 Mobile App
Union Budget 2022 Mobile App

Union Budget 2022: 1 फेब्रुवारी 2022 ला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Finance Minister Nirmala Sitharaman) अर्थसंकल्प (Budget 2022) सादर करणार आहेत. यावेळी देखील हा अर्थसंपकल्प पेपरलेस (Paperless Budget) असणार आहे. गतवर्षी कोरोनामुळे कागदपत्रांशिवाय अर्थसंकल्प मांडण्यास सुरुवात करण्यात आली होती. यावेळी ओमायक्रॉनचं संकट असल्याने यावर्षीही त्याच पद्धतीने अर्थसंलकल्प मांडला जाणार आहे. सकाळी 11 वाजता निर्मला सीतारमण अर्थसंकल्प मांडण्यास सुरुवात करतील. हा अर्थसंकल्प तुम्ही मोबाईल फोनवर (Mobile Phone) देखील पाहू शकता. यासाठी अर्थसंकल्प मंत्रालयाने एक मोबाइल अ‍ॅप आणलं आहे. हे मोबाईल अ‍ॅप अ‍ॅड्रॉईड (Android) आणि आयओएस (IOS) दोन्ही युजर्ससाठी उपलब्ध आहे.

Also Read:

मोबाईल अ‍ॅपवर मिळणार अर्थसंकल्पाची माहिती –

अर्थसंकल्प 2022 संबंधी Union Budget App वर सर्व माहिती मिळणार आहे. या मोबाईल अॅपवर अर्थसंकल्पाचं पूर्ण भाषण तसंच महत्वाची कागदपत्रं उपलब्ध केली जाणार आहेत. हे अॅप हिंदी आणि इंग्रजी भाषेत उपलब्ध असणार आहे. युजर्स त्यांच्या आवडीप्रमाणे भाषा निवडू शकतात.

You may like to read

असं डाऊनलोड करा अ‍ॅप –

Union Budget App अँड्राईड आणि आयओएस दोन्हीकडे उपलब्ध आहे. जर तुम्हाला हे अॅप डाऊनलोड करायचं असेल तर https://www.indiabudget.gov.in/ या वेबसाईटवर जा. वेबसाईट ओपन केल्यानंतर तुम्हाला स्क्रोल केल्यानंतर उजव्या बाजूला डाऊनलोड मोबाईल अ‍ॅपचा पर्याय मिळेल. पर्यायवर क्लिक केल्यानंतर एक नवं पेज ओपन होईल. येथे अ‍ॅप डाऊनलोड करण्याचा पर्याय उपलब्ध असेल. जर तुम्ही अँड्रॉईड फोनचा वापर करत असाल तर Google Play Store वर क्लिक करा. तर आयफोन वापरणारे Apple App Store वर क्लिक करा. पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्ही गुगल प्ले स्टोअर आणि अ‍ॅप स्टोअरमध्ये जाऊ शकता. येथे तुम्हाला डाऊनलोड आणि इंस्टॉलचा पर्याय मिळेल. हे मोबाईल Android v5 आणि iOS v10 या किंवा त्यापेक्षा वरील व्हर्जन डिव्हाईसला सपोर्ट करेल.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 29, 2022 5:11 PM IST

Updated Date: January 29, 2022 5:11 PM IST