UP Assembly Election 2022: भाजपची पहिली यादी जाहीर, मु्ख्यमंत्री योगी आदित्यनाथ गोरखपूरमधून निवडणूक लढणार
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 10 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.

UP Assembly Election 2022: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या (Up Election 2022) पहिल्या टप्प्यात 10 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने (BJP) उमेदवारांची पहिली यादी (bjp candidates first list released) जाहीर केली आहे. विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (UP CM Yogi Adityanath) गोरखपूर विधानसभा मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात (CM Yogi will contest from gorakhapur) उतरणार आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे अयोध्येतून निवडणूक लढवतील, अशी चर्चा होती. मात्र, त्यांना गोरखपूर येथून उमेदवारी देण्यात आली आहे.
Also Read:
भाजपचे राष्ट्रीय सचिव अरुण सिंह ( BJP National General Secretary Arun Singh) आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान (Union Minister Dharmendra Pradhan) यांनी शनिवारी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या टप्प्यात 57 उमेदवारांची तर दुसऱ्या टप्प्यात 38 मतदार संघातील उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे गोरखपूर मतदार संघातून निवडणूक लढणार आहे. तर केशव मोर्या हे सीराथू विधानसभा मतदार संघातून निवडणूक रिंगणात उतरतील.
दरम्यान, या आधी काँग्रेस, समाजवादी पक्ष-राष्ट्रीय लोक दलाच्या आघाडीने आपापल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात पश्चिम उत्तरप्रदेशातील 10 जिल्ह्यातील 58 जागांसाठी 10 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. सपा-रालोद आघाडीने गुरुवारी आपल्या 29 उमेदवारांची यादी जाहीर केली. तर काँग्रेसने 125 उमेदवारांची यादी जाहीर केली. काँग्रेसने 50 महिलांना उमेदवारी दिली आहे.
पाहा कोण कुठून निवडणूक लढणार…
सरदाना – संगीत सोम
गड मुक्तेश्वर – हरेंद्र तेवतिया
जेवर- धीरेंद्र सिंह
दादरी- तेजपाल नागर
खैर – अनूप प्रधान
हस्तिनापूर- दिनेश खटीक
मेरठ केंट- अमित अग्रवाल
बागपत – योगेश धामा
थानाभवन- सुरेश राणा
नोएडा -पंकज सिंह
किठोर- सत्यवीर त्यागी
साहिबाबाद- सुनील शर्मा
धौलाना- धर्मेश
सिकंदरबाद- लक्ष्मीराज सिंह
बुलन्दशहर- प्रदीप चौधरी
सायना- देवेंद्र चौधरी
खुर्जा- मीनाक्षी सिंह
बरौली- जयबीर सिंह
अतरौली- संदीप सिंह
कोल- अनिल पराशर
छाता- लक्ष्मीनारायण
माड- राजेश चौधरी
गोवर्धन- मेघराज सिंह
मथुरा- श्रीकांत शर्मा
बलदेव- पूरण प्रकाश जाटव
एत्मदपुर- धर्मपाल
आगरा दक्षिण- योगेन्द्र उपाध्याय
आगरा- पुरुषोत्तम खंडेलवाल
आगरा देहात- बेबिरानी रानी मोर्या
फतेहपूर सीकरी- बाबूलाल
वाह- रानी पक्षालिका
सहारनपूर- राजीव गुंबर
सहारनपूर- जगपाल सिंह
देवबंद- ब्रजेश रावत
नगीना- डॉक्टर यशवंत
बिजनौर- शुचि मौसम
नूरपुर- सीपी सिंह
मुरादाबाद- कृष्णकांत
मुरादाबाद नगर- रितेश गुप्ता
चन्दौसी- गुलाबों देवी
असमौलि- हरेंद्र सिंह
बिलासपूर- बलदेव सिंह
रामपूर- आकाश सक्सेना
गुन्नौर- अजित कुमार
असमोली- कुशाग्र सागर
बिल्लिसी- हरीश शाक्य
बदायूं- महेश गुप्ता
शेखपूर- धर्मेद्र शाक्य
मेरीगंज- डीसी वर्मा
फरीदपूर- श्यापबिहारी लाल
बिथनी – लाल बिहारी वर्मा
बरेली कैंट- संजीव अग्रवाल
कटरा- वीर बिक्रम सिंह
पुवाया- चतेराम पासी
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या