Top Recommended Stories

UPSC Civil Services Exam: यूपीएससी नागरी सेवा परीक्षेच्या 1012 पदांसाठी मोठी भरती, उमेदवारांनी असा करा अर्ज!

UPSC Civil Services Exam: या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून IAS, IPS, IFS आणि इतर अन्य विभागात अधिकारी होण्याची संधी उमेदवारांना मिळणार आहे.

Published: February 5, 2022 1:34 PM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

UPSC Recruitment 2022
UPSC Recruitment 2022

UPSC Civil Services Exam : केंद्रीय लोकसेवा आयोगांतर्गत ( UPSC ) अधिकारी होण्याचे स्वप्न बघत असलेल्या प्रतिभावंत उमेदवारांसाठी सुवर्णसंधी चालून आली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने नागरी सेवा परीक्षा अंतर्गत भारतीय प्रशासनिक सेवेसाठी ( Civil Services ) 861, भारतीय वन सेवेसाठी ( IFS ) 151 पदांसाठी प्राथमिक परीक्षेसाठी अधिसूचना (UPSC IAS Exam Application 2022) जारी केली आहे. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून IAS, IPS, IFS आणि इतर अन्य विभागात अधिकारी होण्याची संधी उमेदवारांना मिळणार आहे. ज्या पात्र आणि इच्छुक उमेदवारांना या भरती प्रक्रियेअंतर्गत अर्ज करायाचा आहे त्यांनी अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.

Also Read:

महत्वच्या तारखा –

– या पदांसाठी अर्ज करण्याची तारीख 2 फेब्रुवारी 2022
– अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 फेब्रुवारी 2022

You may like to read

अर्ज शुल्क

– सर्वसाधारण गटासाठी – 100 रुपये
– ओबीसी गटासाठी – 100 रुपये
– तर एससी आणि एसटी गटासाठी – निशुल्क

शैक्षणिक पात्रता

– वरील पदांसाठी उमेदवार हा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असावा
– यासह उमेदवाराचे वय 21 ते 32 वर्ष असावे. वयात नियमानुसार सूट देण्यात येणार आहे.

सातव्या वेतन आयोगानुसार मिळणार पगार –

युपीएससी नागरी सेवा परीक्षाअंतर्गत ज्या उमेदवारांची निवड होईल. त्या पुरुष/ महिला उमेदवारांना सातव्या वेतन आयोगाच्या नियमानुसार पगार मिळेल.

असा ऑनलाईन करा अर्ज –

या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी संघ लोकसेवा आयोगाची अधिकृत वेबसाईट upsc.gov.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज भरा. ही ऑनलाईन प्रक्रिया 22 फेबुवारी 2022 पर्यंत सुरु राहणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर उमेदवारांनी आपला ऑनलाइन अर्ज भरावा.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: February 5, 2022 1:34 PM IST