
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.
UPSC Recruitment 2022: केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) एक भरती अधिसूचना जारी केली आहे. याअंतर्गत पात्र उमेदवारांकडून सहायक प्राध्यापक आणि इतर पदांसाठी (UPSC Recruitment 2022 Vacancy) अर्ज मागवण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवार यूपीएससीची अधिकृत वेबसाईट upsc.gov.in वर जाऊन या पदांसाठी ऑनलाइन अर्ज (UPSC Jobs 2022) करू शकतात. अर्जदार 14 जुलै 2022 पर्यंत अर्ज करू शकतात. विभागात एकूण 13 पदे भरली जातील. अधिकृत अधिसूचनेनुसार पूर्णपणे सबमिट केलेले ऑनलाइन अर्ज (How to Apply Online) प्रिंट करण्याची अंतिम तारीख 15 जुलै 2022 आहे.
या भरती प्रक्रियेतील पात्रता, अनुभव, निवड, निकष आणि इतर तपशीलांबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी अधिसूचना पाहण्याचा सल्ला दिला जातो. इच्छुक आणि पात्र उमेदवार या लिंकवर https://upsconline.nic.in/ora/oraauth/candidate/download_ad.php? क्लिक करून अधिसूचना तपासू शकतात. तसेच या लिंकवर https://upsconline.nic.in/ora/VacancyNoticePub.php जाऊन अर्ज करू शकतात.
ORA वेबसाइटद्वारे ऑनलाइन भरती अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख: 14 जुलै 2022
पूर्णपणे सबमिट केलेले ऑनलाइन अर्ज छापण्याची अंतिम तारीख : 15 जुलै 2022
एरोनॉटिकल ऑफिसर (Aeronautical Officer) : 6 पदे
प्राध्यापक (Professor): 01 पद
सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor): 04 पदे
न्यूरो सायकॉलॉजीचे सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor of Neuro Psychology): 01 पद
अभियंता आणि जहाज सर्वेक्षक सह-उपमहासंचालक (Technical): 01 पद
एरोनॉटिकल ऑफिसर: मान्यताप्राप्त विद्यापीठातून एरोनॉटिकल किंवा इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा मेकॅनिकल किंवा मेटलर्जिकल अभियांत्रिकीची पदवी असावी.
प्रोफेसर: मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून मानसशास्त्र किंवा क्लिनिकल सायकोलॉजीमध्ये पदव्युत्तर पदवी. (ii) मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून क्लिनिकल सायकोलॉजीमध्ये तत्त्वज्ञानात पदव्युत्तर. (iii) मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेकडून क्लिनिकल सायकॉलॉजीमध्ये डॉक्टरेट पदवी (पीएच.डी.).
उमेदवारांना 25/- रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. हे शुक्ल एकतर SBI च्या कोणत्याही शाखेत रोखीने किंवा SBI च्या नेट बँकिंग सुविधेचा वापर करून किंवा व्हिसा/मास्टर क्रेडिट/डेबिट कार्ड वापरून पैसे भरता येईल. कोणत्याही श्रेणीतील SC/ST/PwBD/महिला उमेदवारांसाठी कोणतेही शुल्क नाही.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या