Top Recommended Stories

UPSC Success Story: मुलाला दिसत नाही म्हणून आईने लिहिला पेपर, मुलाने क्रॅक केली यूपीएससी परीक्षा

UPSC Success Story: तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल आणि यश मिळत नसल्याने निराश झाले असाल तर यूपीएससी परीक्षा पास झालेल्या सम्यक जैनची गोष्ट तुम्हाला नक्कीच प्रेरणा देऊ शकते. डोळ्याने दिसत नसूनही सम्यकने यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आहे.

Updated: May 31, 2022 1:51 PM IST

By India.com News Desk | Edited by Chandrakant Jagtap

UPSC Success Story: मुलाला दिसत नाही म्हणून आईने लिहिला पेपर, मुलाने क्रॅक केली यूपीएससी परीक्षा
Samyak Jain Success Story

UPSC Success Story: स्वप्न पाहण्यासाठी आणि ती पूर्ण करण्यासाठी डोळ्यांची नव्हे तर धैर्य आणि इच्छाशक्ती लागते आणि हे दिल्लीच्या सम्यक जैन (Samyak Jain Success Story) या विद्यार्थ्याने सिद्ध करून दाखवले आहे. सम्यक जैन (Samyak Jain) डोळ्यांनी पाहू शकत नाही, परंतु त्याने आयएएस होण्याचे स्वप्न पाहिले आणि ते पूर्ण देखील (UPSC Exam 2021 Result) केले. यूपीएससी नागरी सेवा परीक्षा 2021 च्या निकालात त्याने 7 वा क्रमांक (Samyak Jain UPSC Rank) मिळवून टॉप-10 मध्ये स्थान मिळवले आहे.

सम्यकने 2020 मध्ये पहिला अटेम्पट केला होता, त्यात तो अयशस्वी ठरला होता. मात्र त्याने मेहनत करणे थांबवले नाही आणि सततच्या प्रयत्नांमुळे त्याने दुसऱ्याच प्रयत्नात यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली. यासोबतच त्याने या परीक्षेत एक अंकी रँकही मिळवला आहे. सम्यक म्हणतो की UPSC चा प्रवास इतका सोपा नव्हता. तो PWD श्रेणीतून आला आहे, कारण तो दृष्टीहीन आहे. परीक्षा लिहिण्यासाठी त्याने एका राइटरची मदत घेतली. त्याने सांगितले की “माझ्या आईने प्रिलिम्स परीक्षेत माझा पेपर लिहिला होता. तर मुख्य परीक्षेत माझ्या एका मित्राने राइटर म्हणून माझा पेपर लिहिला”.

You may like to read

सोपा नव्हता प्रवास, पण कुटुंबाने दिली साथ

सम्यक जैनसाठी हा प्रवास सोपा नव्हता. त्याने जे केले त्यामागे त्याच्या कुटूंबाचा देखील मोठा हात आहे. कारण त्याच्यासोबत त्याचे संपूर्ण कुटुंब या तयारीचा एक भाग बनले होते. सम्यकला डोळ्यांनी दिसत नाही त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी त्याचा अभ्यासक्रम वाचून पूर्ण करून दिला आणि सम्यकने हे सर्व संस्मरणात ठेवण्याचे काम केले. त्यांची आई वंदना जैन यांनी त्यांचा पेपर लिहिला. म्हणजेच सम्यकने प्रश्नांची उत्तरे दिली आणि आईने त्याची उत्तरे लिहिली. वडील एअर इंडियात काम करतात, त्यामुळे त्यांचे मामा त्यांना पेपर देण्यासाठी घेऊन जात होते.

वयाच्या 20 व्या वर्षी दिसणे झाले बंद

सम्यकला बालपणी चांगले दिसत होते. त्याने शालेय अभ्यास व्यवस्थित केला आणि नंतर दिल्ली विद्यापीठाच्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. सम्यकने मुंबईतून शालेय शिक्षण आणि दिल्ली विद्यापीठातून पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. पण हळूहळू त्याची दृष्टी कमी होऊ लागली. वयाच्या 20 वर्षांनंतर, वयाच्या 23 किंवा 24 व्या वर्षी सम्यकला डोळ्यांनी दिसणे पूर्णपणे बंद झाले. पण सम्यकने त्याच्यापूढे असलेली आव्हाने सोडली नाहीत. त्याने अभ्यास सोडला नाही. ग्रॅज्युएशननंतर त्याने जेएनयूमधून इंटरनॅशनल रिलेशनल रिलेशनमध्ये पदवी मिळवली.

उमेदवारांना दिलेल्या या टिप्स

1. शरीराच्या अपंगत्वाला तुमच्या मनावर प्रभुत्व मिळवू देऊ नका. कठोर परिश्रम करा आणि यश मिळवा. जे पाहू शकत नाहीत, त्यांनी निराश होऊ नये, ते आयुष्यात खूप काही करू शकतात.
2. जे विद्यार्थी पाहू शकत नाहीत त्यांच्यासाठीही सर्व प्रकारची पुस्तके उपलब्ध आहेत. ही पुस्तके ऑनलाइनही उपलब्ध आहेत. ही पुस्तके अगदी मोफत आहेत.
3. आत्मविश्वासाची कमतरता भासू देऊ नका. कधीही नकारात्मक विचार करू नका.
4. तुम्ही जे काही वाचता ते लक्षात ठेवण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी ते पुन्हा एकदा नक्की वाचा.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.