Top Recommended Stories

2 बूस्टर डोस घेऊनही अमेरिकेच्या उपाध्यक्षा कमला हॅरिस Coroana Positive

US Vice President Kamala Harris Corona Positive: अमेरिकेच्या उपाध्यक्षा कमला हॅरिस (57) यांना कोरोनाची लागण झाली आहे. धक्कादायक म्हणजे त्यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये कोरोनाचे दोन बूस्टर डोस घेतले होते.

Published: April 27, 2022 10:17 AM IST

By India.com News Desk | Edited by पी.संदीप

2 बूस्टर डोस घेऊनही अमेरिकेच्या उपाध्यक्षा कमला हॅरिस Coroana Positive

US Vice President Kamala Harris Corona Positive: बातमी अमेरिकेतून आहे. अमेरिकेच्या उपाध्यक्षा कमला हॅरिस (US Vice President Kamala Harris) यांना कोरोनाची लागण (Coronavirus) झाल्याची माहिती मिळाली आहे. (Kamala Harris Tests Covid Positive) याबाबत व्हाईट हाऊसने माहिती दिली आहे.

Also Read:

व्हाईट हाऊसने दिलेली माहिती अशी की, कमला हॅरिस यांना कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळून आली नाही. मात्र, त्यांची रॅपिड आणि पीसीआर टेस्ट पॉझिटिव्हआ आली आहे. त्यानंतर कमला हॅरिस त्यांच्या निवासस्थानीच क्वारंटाईन करण्यात आले आहे. घरी राहूनच त्या आपल्या कामकाजावर लक्ष ठेवणार आहेत. कोरोनामुक्त झाल्यानंतर त्या व्हाईट हाऊस येतील.

You may like to read

कोरोनाचे 2 बूस्टर डोस घेऊनही झाली लागण…

कमला हॅरिस यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतले आहेत. तसेच गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात त्यांनी कोरोनाचे दोन बूस्टर डोस घेतले होते. तरी देखील त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. इतकेच नाही तर त्यांनी 1 एप्रिल रोजी कोरोनाचा अतिरिक्त बूस्टर डोस देखील घेतला होता.

दरम्यान, कमला हॅरिस यांचे पती डग इमहॉफ यांना गेल्या मार्च महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. पण त्यावेळी कमला हॅरिस यांची कोरोना टेस्ट रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनाही कोरोनाची लागण झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र, त्यांचा कोरोना टेस्ट रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. तसेच गेल्या मार्च महिन्यात व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी जेन पास्की आणि अमेरिकन काँग्रेसच्या नॅन्सी पेलोसी यांनाही ही कोरोनाची लागण झाली होती.

व्हाईट हाऊसमध्ये काही जण कोव्हिड पॉझिटिव्ह असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मंत्र्यांसह सर्व अधिकाऱ्यांचे लसीकरण झाले आहे. तसेच सगळ्यांनी बूस्टर डोसही घेतले आहेत. परंतु गेल्या काही दिवसांत वॉशिंग्टनमधील अनेक लोक कोरोनाने आपल्या विळख्यात सापडले आहेत, अशी माहिती व्हाईट हाऊसच्या कम्युनिकेशन डायरेक्टर केट बेडिंगफिल्ड यांनी दिली आहे.

कोरोनामुळे दररोज होतो 300 ते 400 जणांचा मृत्यू

न्यूयॉर्क टाइम्सनुसार, गेल्या आठवड्यात अमेरिकेत 12 हजारांहून अधिक कोरोनाचे नवे रुग्ण आढळले होते. अमेरिकेत सध्या कोरोनामुळे दररोज 300 ते 400 जणांचा मृत्यू होत आहे. तसेच आतापर्यंत अमेरिकेत सुमारे 9 लाख 83 हजार नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

दरम्यान, अमेरिकेत कोरोनाचा संसर्गाचा वेग कमी झाल्यानंतर अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले होते. मास्कची सक्ती देखील दूर करण्यात आली होती.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: April 27, 2022 10:17 AM IST