Top Recommended Stories

Earthquake: उत्तरकाशी 3.1 तीव्रतेच्या भूकंपाने हादरली, नेपाळमध्येही जाणवले धक्के

Earthquake in Uttarkashi: उत्तराखंडची उत्तरकाशी (Uttarkashi News) सोमवारी 3.1 तीव्रतेच्या भूकंपाने हादरली. नेपाळमध्येही (Nepal) या भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती मिळाली आहे.

Published: December 19, 2022 11:24 AM IST

By India.com News Desk | Edited by पी.संदीप

उत्तरकाशीमध्ये भूकंप
उत्तरकाशीमध्ये भूकंप

Earthquake in Uttarkashi: उत्तराखंडची उत्तरकाशीमध्ये (Uttarkashi News) सोमवारी मध्यरात्री 1 वाजून 50 मिनिटांला 3.1 तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले. नेपाळ (Nepal Earthquake) देखील रविवारी रात्री 4.1 तीव्रतेच्या भूकंपाने हादरला. या भूकंपामुळे कोणतीही जीवित आणि वित्तहानी झाली नसल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख बृजेश भट्ट यांनी दिली आहे. उत्तरकाशीमध्ये जमिनीत 5 किलोमीटर अंतरावर भूकंपाचा केंद्रबिंदू होता. याआधी 12 डिसेंबर आणि 6 नोव्हेंबरला उत्तराखंडतील टिहरीमध्ये 4.5 तीव्रतेचा भूकंप आला होता. बिहारपासून हिमाचल प्रदेशातील कांगडापर्यंत भूकंपाचे धक्के जाणवले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, भूकंपाचे धक्के दूनसह संपूर्ण राज्यात जाणवले. यूरेशियन प्लेटप्रमाणे इंडियन प्लेट देखील प्रत्येक वर्षी चार ते पांच सेंटीमीटर पुढे सरकत आहे. त्यामुळे भूगर्भात हालचाल सुरू असल्याची माहिती वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ हिमालयन जियोलॉजीचे प्रमुख भूकंप शास्त्रज्ञ डॉ.अजय पॉल यांनी दिली आहे.

You may like to read

त्यामुळे उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर आणि नेपाळ सारख्या हिमालयन भागात मागील काही दिवसांपासून भूकंप जाणवत आहे. भूगर्भात मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्माण होत आहे. रिक्टर स्केल पर कम तीव्रता वाले भूकंप इस बात का संकेत नहीं है कि भविष्य में बड़े भूकंप नहीं आएंगे। जो सेंट्रल सिस्मिक गैप बिहार से हिमाचल प्रदेश के कांगड़ा तक है, इस इलाके में बड़े भूकंप की आशंका बरकरार है।

नेपाळमध्ये जाणवले 4.5 तीव्रतेचे धक्के

नेपाळमध्ये रविवारी रात्री 10 वाजून 53 मिनिटांला भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 4.5 इतकी मोजण्यात आली. भूकंपाचा केंद्रबिंदू काठमांडूच्या पश्चिमेला 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या धाडिंग जिल्ह्यात होता. भूकंपामुळे काठमांडूसह आजुबाजूचे जिल्हे हादरले.

नेपाळमध्ये वर्षभरात आले 28 भूकंप..

दरम्यान, नेपाळमध्ये भूकंपाची मालिका सुरूच आहे. वर्षभरात लहान-मोठे एकूण 28 भूकंपाचे धक्के जाणवले. 8 नोव्हेंबरला आलेल्या 6.6 तीव्रतेच्या भूकंपाने एकूण 6 जणांचा बळी घेतला होता.

Also Read:

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.