नवी दिल्ली: कोरोनाव्हायरसचा न्यू व्हेरिएंट डेल्टा प्लसचा (Delta Plus) देशभरात प्रादुर्भाव वाढत आहे. त्यातच कोरोनाची तिसरी लाटेची (Third Wave of Covid19) टांगती तलवार कायम आहे. पुढील 6 ते 8 आठवड्यांत कोरोनाची तिसरी लाट येणार असून ती लहान मुलांसाठी धोकादायक असल्याची माहिती देणारे अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थानचे (AIIMS) प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया (AIIMS Doctor Randeep Guleria) यांनी एक आनंदाची बातमी दिली आहे. येत्या सप्टेंबरपर्यंत 2 वर्षांवरील लहान मुलांसाठी लस उपलब्ध होणार आहे..Also Read - Ajit Pawar Corona Positive : उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण, ट्वीट करत म्हणाले...

डॉ. रणदीप गुलेरिया यांनी ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या माहितीनुसार, 2 वर्षावरील मुलांना भारत बायोटेक कंपनीची (Bharat Boitech Company) कोव्हॅक्सिन ( covaxin) लस दिली जाणार आहे. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीलर देशात लहान मुलांच्या लसीकरणासाठी मोठी यंत्रणा कामाला लागली आहे. जून महिन्यापासूनच लहान मुलांच्या लसीच्या चाचणीला सुरुवात झाली आहे. कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात चाचणी निष्कर्ष सप्टेंबरपर्यंत मिळेल. सध्या देशात 2 ते 17 वर्षेवयोगटातील मुलांसाठी लसीची चाचणी सुरू आहे. Also Read - Rohit Sharma Tested Covid Positive: इंग्लंडविरुद्ध पाचव्या कसोटीपूर्वी कर्णधार रोहित शर्माला कोरोनाची लागण

डॉ. गुलेरिया म्हणाले, फायझर-बायोटेकच्या (Pfizer-BioNTech) लशीला परवानगी मिळाल्यास ती देखील लहान मुलांच्या लसीकरणासाठी उपलब्ध होईल, दिल्लीतील एम्ससह देशातील विविध राज्यात आणि केंद्रशासित प्रदेशात 2 ते 17 वयोगटातील मुलांसाठी कोव्हॅक्सिनची चाचणी घेतली जात आहे. Also Read - Corona Vaccine for Children: आनंदवार्ता! 7 ते 11 वयोगटातील मुलांचे लवकरच लसीकरण, या लसीच्या वापराला मिळाली मंजुरी

दरम्यान, देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोरोनाची तिसरी प्रामुख्याने लहान मुलांसाठी धोकादायक असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रार्श्वभूमीवर देशात लहान मुलांच्या लसीकरणासाठी मोठी यंत्रणा सध्या कामाला लागली आहे. जून महिन्यापासूनच लहान मुलांच्या लसीच्या चाचणीला सुरुवात झाली आहे. दुसरीकडे, कोरोनाव्हायरसचा न्यू व्हेरिएंट डेल्टा प्लस व्हेरिएंटचा (delta plus veriant) संसर्ग वाढत आहे. पुढील काळात कोरोनाचा हा नवा प्रकार आणखी चिंता वाढणार असल्याची भीती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं व्यक्त केली आहे.