नवी दिल्ली: देशातील कोरोनाच्या (Corona) दुसर्‍या लाटेचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होत आहे. चार लाखांच्या वर गेलेली दररोज आढळणाऱ्या नव्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता आटोक्यात आली असून ती सध्या 30 ते 40 हजारांच्या दरम्यान आली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी सरकारकडून मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. तीन कंपन्यांच्या लसींच्या माध्यमातून सध्या देशभरात लसीकरण सुरू आहे. लवकरच आणखी काही नव्या लसी येणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी (Mansukh Mandaviya) नवी माहिती दिली आहे.Also Read - Covid19 Vaccine For Children: 5 ते 11 वर्षांच्या मुलांसाठीही उपलब्ध होणार कोरोना व्हॅक्सीन! चाचणीत प्रभावी ठरली फायझरची लस

मीडिया रिपोर्टनुसार मनसुख मांडविया म्हणाले की ऑगस्ट महिन्यांपासून मुलांसाठी लस (Vaccine For Children) येऊ शकते. मंगळवारी भाजपच्या (BJP) संसदीय सदस्यांच्या बैठकीत आरोग्य मंत्र्यांनी ही माहिती दिल्याचे माध्यमांतील वृत्तांमध्ये म्हटले आहे. देशात सध्या 18 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या लोकांना कोरोना प्रतिबंधक लस (Corona vaccine) देण्यात येत आहे. त्यामुळे ही लस उपलब्ध झाल्यास पुढील महिन्यापासून 18 वर्षाच्या आतील मुलांचेही लसीकरण सुरू होण्याची शक्यता आहे. (Vaccine For Children Vaccination for children is likely to start from next month Information given by the Union Health Minister Mansukh Mandaviya) Also Read - Corona Vaccine: पालकांना मोठा दिलासा! ऑक्टोबरपासून 12 ते 17 वयोगटातील मुलांना मिळणार कोरोना प्रतिबंधक लस!

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया यांनी भाजपा (BJP) खासदारांना ही माहिती दिली आहे. यापूर्वी मुलांसाठी सप्टेंबरपर्यंत कोरोना प्रतिबंधक लस (Vaccine For Children) येण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. दरम्यान, एम्सचे (AIIMS) अध्यक्ष डॉ. रणदीप गुलेरिया यांनीही गेल्या आठवड्यात सप्टेंबर 2021 पर्यंत मुलांसाठी कोरोना लसीच्या वापरासाठी मंजूरी मिळू शकते अशी माहिती दिली होती. देशात झायडस कॅडिला (Zydus Cadila) ची मुलांसाठी असलेली लस अंतिम टप्प्यात आहे. Also Read - Corona Vaccine Update: मुंबईत उद्या फक्त महिलांनाच मिळणार कोरोना प्रतिबंधक लस!

तज्ज्ञांचे मते घातक कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी मुलांचे लसीकरण हे महत्त्वाचे आणि मोठे पाऊल ठरू शकते. तसेच ही लस उपलब्ध झाल्यास सरकार कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन देशभरातील शाळा पुन्हा एकदा खुल्या करण्याचा विचार करू शकते. (Vaccine For Children Vaccination for children is likely to start from next month Information given by the Union Health Minister Mansukh Mandaviya)