नवी दिल्ली: देशभरातील गरोदर महिलांसाठी महत्त्वाची माहिती आहे. गरोदर महिलांच्या कोरोना लसीकरणाचा (Corona Vaccination For Pregnant Women) मार्ग आता मोकळा झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातील सरकारनं राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गट अर्थात NTAGIची (National Technical Advisory Group on Immunisation) शिफारसीला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे आता देशभरातील गरोदर महिलांनी कोरोना लस घेता येणार आहे.Also Read - Covid19 Vaccine For Children: 5 ते 11 वर्षांच्या मुलांसाठीही उपलब्ध होणार कोरोना व्हॅक्सीन! चाचणीत प्रभावी ठरली फायझरची लस

NTAGI ने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे गरोदर महिलांसाठी देखील कोरोना लस देण्यास परवानंगी द्यावी, अशी शिफारस केली होती. या शिफारसीला शुक्रवारी मंजुरी देण्यात आली. गरोदर महिलांना (Pregnant Women) कोरोना लस (Covid-19 Vaccine) घ्यायची असल्यास त्यांना कोविन (CoWIN) पोर्टलवर नोंदणी करावी लागणार आहे. याशिवाय गरोदर महिलांना जवळच्या लसीकरण केंद्रावर जाऊन देखील थेट लस घेता येईल, अशी माहिती आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. Also Read - Breaking News Live Updates: "देवेंद्र फडणवीस शंभर अजित पवार खिशात घेऊन फिरतात"; चंद्रकांत पाटील यांचं मोठं विधान

आरोग्य मंत्रालयानुसार, गरोदर महिला कोणत्याही महिन्यात कोरोना लस घेऊ शकतात. गर्भवतींनी लसीकरण करून घेणं हे त्यांच्या गर्भातल्या बाळांच्या आरोग्यासाठी हितकारक आहे. कोरोना लस मृत्यूपासून आपलं 98 टक्कांपर्यंत संरक्षण करते. Also Read - Corona Vaccine: पालकांना मोठा दिलासा! ऑक्टोबरपासून 12 ते 17 वयोगटातील मुलांना मिळणार कोरोना प्रतिबंधक लस!

कोरोनाची दुसरी लाट संपली नाही-

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलं, की कोरोनाची दुसरी लाट संपलेली नाही. लसीकरण आणि कोविड-19 च्या नियमांच पालण करा. नागरिकांनी निष्काळजीपणा करू नये.

दरम्यान, देशभरात शुक्रवारी एक दिवसात कोरोनाच्या रुग्णसंख्येत 46,617 भर पडली. देशातील कोरोना रुग्णांची आकडेवारी 3,04,58,251 झाली आहे. तर रुग्ण बरे होण्याचा दर अर्थात रिकव्हरी रेट 97 टक्क्यांवर पोहोचला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, शुक्रवार दिवसभरात देशात कोरोनामुळे 853 रुग्णांचा मृत्यू झाला. मृतांची एकूण आकडेवारी 4,00,312 वर पोहोचली आहे.