Omicronवर लवकरच लस येणार, 'सीरम'ला निर्मिती करण्यास DCGIने दिली परवानगी!
Vaccine On Omicron: सिरम इन्स्टिट्यूटने ओमक्रॉनचा संसर्ग रोखण्याच्या दृष्टीकोनातून चाचणी आणि विश्लेषण करण्यासाठी लस तयार करण्यास परवानगी द्या, अशी मागणी डीसीजीआयकडे केली होती.

Vaccine On Omicron: कोरोनामुळे (Corona Virus) गेल्या दोन वर्षांपासून जगामध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यातच कोरोनाचा नवा व्हेरिएंट (Corona Virus New Variant) ओमिक्रॉनने देखील जगाची चिंता वाढवली आहे. भारतामध्ये देखील ओमिक्रॉनचे रुग्ण (Omicron) आढळत आहेत. ओमिक्रॉन व्हेरिएंटवर अद्याप कोणत्याही देशाने लस (Corona Vaccine) तयार केली नाही. पण भारतामध्ये ओमिक्रॉनवर लवकरच लस (Vaccine On Omicron) येणार आहे. या लसची निर्मिती करण्यासाठी सीरम इन्स्टिट्यूटला (Serum Institute Of India) मंजुरी मिळाली आहे. ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (DCGI) ही मंजुरी दिली आहे.
Also Read:
सीरम इन्स्टिट्यूटने ओमक्रॉनचा संसर्ग रोखण्याच्या दृष्टीकोनातून चाचणी आणि विश्लेषण करण्यासाठी लस तयार करण्यास परवानगी द्या, अशी मागणी डीसीजीआयकडे केली होती. सीरम इन्स्टिट्यूटने केलेली मागणी 2019मधीन नवीन औषध आणि क्लिनिकल चाचणी नियमांमधील (Drug And Clinical Trial Regulations) तरतुदींच्या आधारे मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे आता ओमिक्रॉन व्हेरिएंटवर लस येण्याचा मार्ग सुकर झाला आहे.
देशामध्ये कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनमुळे तिसरी लाट (Third Wave Of Corona) आली आहे. तिसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांसोबतच ओमिक्रॉन रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. ही लाट वेळीच आटोक्यात आणण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत. सरकारकडून (Central Government) यासाठी लसीच्या निर्मितीला चालना दिली जात आहे. याच अंतर्गत सरकारने सिरम इन्स्टिट्यूटला ओमिक्रॉनवर लस तयार करण्यास परवानगी दिली आहे. त्याचसोबत सरकारकडून लसीकरण मोहीम वेगाने राबवली जात आहे. आता देशामध्ये 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरु केले आहेत. तसंच लवकरच 12 ते 15 वयोगटातील मुलांना लस दिली जाणार आहे. शाळांमध्ये (School) देखील सरकारकडून लसीकरण मोहिम (Vaccination) राबवली जात आहे.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या