मुंबई : आज वटपौर्णिमा आहे. हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारा पौर्णिमा हा दिवस “वटपौर्णिमा” म्हणून साजरा केला जातो. या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमा नावाचं व्रत करतात. या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभावं यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात.Also Read - Vat Savitri Vrat Katha : वटपौर्णिमानिमित्त जाणून घ्या वट सावित्री व्रत कथा!

वटपौर्णिमेच्या दिवशी महिला सावित्रीचं व्रत करतात. हे व्रत करण्याचं महात्म्य पुराणात देखील सांगितले आहे. वटसावित्री व्रताचे नाव वटवृक्षाशी संबंधित आहे. त्यामुलं या व्रतात वडाच्या झाडाचं काय आहे महत्त्व आणि पूजेच्या ताटात कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत हे जाणून घेऊयात. Also Read - Vat Purnima Pooja Special : वटपौर्णिमानिमित्त वटवृक्षाला पूजायला जाताय, मग पूजेच्या ताटात या वस्तू नक्की घ्या!

वटवृक्षाचे महत्त्व

पुराणात ज्या झाडांना फलदायी असे म्हटले जाते त्यामध्ये वटवृक्षाचा म्हणजेच वडाच्या झाडाचा देखील समावेश आहे. असे म्हणतात की हे झाड इतके पवित्र आहे की त्यामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महादेव यांचा वास असतो. वटपौर्णिमेला या झाडाची पूजा करण्यामागे पतीच्या दीर्घायुष्याची इच्छा व्यक्त करणे आहे.

वटपौर्णिमेला स्त्रिया वाडाच्या झाडाची पूजा करतात आणि अशी इच्छा व्यक्त करतात की या वटवृक्षाचं आयुष्य जसे दीर्घकाळ असते, वटवृक्ष 300 पेक्षा जास्त आयुष्य जगतो. त्याचप्रमाणे पतीलाही दीर्घायुष्य लाभावं. वटवृक्ष जसा हिरवागार राहतो तसं त्यांचं कुंकू देखील कायम रहावं आणि पतीवर कोणतही संकट येऊ नये.

पौराणिक कथेनुसार वटपौर्णिमेच्या दिवशी सावित्रीने यमराजपासून पती सत्यवान यांचे प्राण परत आणले. यासाठी सावित्रीने पती सत्यवानला वटवृक्षाखाली झोपवले. तिथे पूजा करुन त्यांचे आयुष्य परत मागितले. म्हणूनच या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते.

वटपौर्णिमेला पूजेचा ताटात काय हवे

 • तांदूळ (अक्षता)
 • श्रृंगाराचे साहित्य
 • आंबा, लीची, हंगामी फळे
 • मिठाई, बत्तासे
 • मोळी
 • कच्चा धागा
 • लाल कपडा
 • नारळ
 • अत्तर
 • पान
 • कुंकू
 • दुर्वा
 • सुपारी
 • पाणी