मुंबई : वट सावित्री पौर्णिमेचं व्रत वेगवेगळ्या ठिकाणी वर्षातून दोन वेळा करण्यात येते. उत्तर भारतातील पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि ओरिसा अशा अनेक ठिकाणी वट सावित्री व्रत ज्येष्ठ महिन्याच्या अमावस्येच्या दिवशी केले जाते. महाराष्ट्र, गुजरात आणि दक्षिण भारतीय राज्यांत हे व्रत ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेचा दिवसी केले जाते.

महाराष्ट्रात आज गुरुवारी, 24 जून 2021 रोजी पौर्णिमेच्या दिवशी वट सावित्री व्रत साजरे केले जात आहे. धार्मिक मान्यतेनुसार सावित्रीचा पती सत्यवानला वडाच्या झाडाखाली जीवनदान मिळालं म्हणून या व्रतामध्ये वडाच्या झाडाची पूजा केली जाते आणि त्याच्या भोवती सूत बांधले जाते. चला तर मग वट सावित्रीचे व्रत, शुभ मुहूर्त, उपासनेची पद्धत आणि पूजेमध्ये वापरली जाणारी सामग्री यांचे महत्त्व जाणून घेऊया.

वट सावित्री व्रताचा मुहूर्त (Vat Savitri Vratcha Muhurta)

वट सावित्रीचे व्रत 24 जून रोजी केले जाईल

ज्येष्ठ मास पौर्णिमेची तिथी आरंभ – 24 जून 2021 गुरुवारी पहाटे 03:32 पासून
ज्येष्ठ मास पौर्णिमेची तिथी समाप्ती – 25 जून 2021 शुक्रवारी मध्यरात्री 12.09 वाजता

वट सावित्री व्रताचे महत्त्व (Vat Savitri Vratache mahatva)

पौराणिक आख्यायिकेनुसार, सावित्रीने आपल्या पतीचे प्राण यमराजपासून वाचवले होते. तसंच पुत्र प्राप्ति आणि सासू-सासऱ्याचे राज्य परत मिळवण्यासाठीचे वरदान त्यांच्याकडे मागतिले होते. म्हणूनच पतींच्या दीर्घायुष्यासाठी आणि पुत्र प्राप्तिसाठी स्त्रिया हा उपवास करतात. तसंच हा उपवास केल्याने आनंद आणि समृद्धी पाप्त होते असे मानले जाते.

वट सावित्री व्रतासाठी लागणारी पूजा सामग्री (Vat Savitri Vratasathi Laganari Pooja samagri)

पूजेसाठी पिवळा कलावा किंवा सूत, कुंकू, बांबूचा पंखा, दिवा, तूपवात, सुगंधी धूप, भिजवलेला हरभरा, गुलगुले, पुरी, फळे व फुले, वडाचे फळ, पाणी भरलेला कळस, पूजेसाठी सिंदूर आणि श्रृंगाराच्या वस्तू.

वट सावित्री पूजेचा विधी (Vat Savitri Pooja Vidhi)

  • या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ करावी व लाल किंवा पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करून तयार व्हावे.
  • पूजेची सर्व सामग्री एका ठिकाणी गोळा करून ताट सजवावे.
  • एखाद्या वटवृक्षाखाली सावित्री आणि सत्यवानाची मूर्ती तयार करावी.
  • यानंतर वटवृक्षाच्या मुळाला पाणी देऊन फुले, अक्षता, भिजलेला हरभरा, गूळ आणि मिठाई अर्पण करावी.
  • यानंतर वटवृक्षाला सूत गुंडाळत सात प्रदक्षिणा घाला आणि शेवटी नमस्कार करून प्रदक्षिणा पूर्ण करावी.
  • यानंतर हातात हरभरा घेऊन वट सावित्रीची कथा वाचा किंवा ऐकावी.
  • वटपूजेनंतर ब्राह्मणांना फळे आणि कपडे दान करावे.