Top Recommended Stories

Voter id card Online download : डिजिटल व्होटर आयडी म्हणजे काय? कसे डाउनलोड करावे? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस

Voter id card Online download : देशात आणि राज्यात निडवणुकीचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत तुमच्यासाठी मतदान कार्ड सर्वात महत्वाचे दस्तावेज आहे. मतदान कार्ड केवळ मत देण्यासाठीच नाही तर रहिवासी पुरावा म्हणून देखील वापरले जाते. व्होटर आयडी हरवलं तर अनेक टेन्शन घेतात.

Published: January 25, 2022 3:10 PM IST

By India.com News Desk | Edited by Chandrakant Jagtap

Voter id card Online download : डिजिटल व्होटर आयडी म्हणजे काय? कसे डाउनलोड करावे? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस
Voter id card Online download :

Voter id card Online download : देशात आणि राज्यात निडवणुकीचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत तुमच्यासाठी मतदान कार्ड सर्वात महत्वाचे दस्तावेज आहे. मतदान कार्ड केवळ मत देण्यासाठीच नाही तर रहिवासी पुरावा (e-EPIC card) म्हणून देखील वापरले जाते. व्होटर आयडी हरवलं तर अनेक टेन्शन घेतात. मात्र तंत्रज्ञानाच्या या युगात तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. कारण गेल्या वर्षी 25 जानेवारी 2021 रोजी राष्ट्रीय मतदार दिनचा (National Voter’s Day 2022) निमित्ताने निवडणूक आयोगाने डिजिटल व्होटर आयडी कार्ड (Digital Voter ID) किंवा इलेक्टोरल व्होटर आयडीची (Electoral Voter ID) घोषणा केली होती. जे तुम्ही घरबसल्या डाउनलोड करू शकता. डिजिटल व्होटर आयडी (Digital Voter ID) म्हणजे काय आणि ते कसे डाउनलोड करायचे हे जाणून घेऊया…

Digital Voter ID म्हणजे काय?

डिजिटल व्होटर आयडी (Digital Voter ID) किंवा इलेक्टोरल व्होटर आयडी (electoral Voter ID) बद्दल बोलायचे तर ते सुरक्षित पोर्टेबल फॉरमॅट व्हर्जन आहे. जे तुम्ही तुमच्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरवर सहज डाउनलोड करू शकता. त्यानंतर तुम्ही ते डिजी लॉकर अॅपमध्ये (Digi Locker App) अपलोड करू शकता. यानंतर तुम्हाला मतदार ओळखपत्र सोबत ठेवण्याची गरज नाही. निवडणूक आयोगाने गेल्या वर्षी ही सुविधा सुरू केली होती. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे शहर किंवा राज्य बदलल्यावर तुम्हाला नवीन मतदार ओळखपत्रासाठी विनंती करावी लागणार नाही. तुम्ही फक्त पत्ता बदलून इलेक्टोरल व्होटर आयडी (electoral Voter ID) वापरू शकता. हे कार्ड कसे डाउनलोड करायचे ते जाणून घेऊया…

You may like to read

Digital Voter ID कसे डाउनलोड करावे?

  • Digital Voter ID डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला प्रथम https://www.nvsp.in/ वेबसाइटवर जावे लागेल.
  • येथे तुम्हाला डाउनलोड e-EPIC कार्डचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.
  • त्यानंतर तुम्हाला येथे लॉगिन करून नोंदणी करावी लागेल.
  • नंतर e-EPIC डाउनलोड वर क्लिक करा आणि तुमचा EPIC क्रमांक येथे प्रविष्ट करा.
  • यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर एक ओटीपी पाठवला जाईल.
  • या ओटीपीची पडताळणी केल्यानंतर तुम्ही e-EPIC वर क्लिक करून डिजिटल मतदार ओळखपत्र डाउनलोड करू शकता.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 25, 2022 3:10 PM IST