Top Recommended Stories

What is Economic Survey: अर्थसंकल्पाच्या एक दिवस आधी का सादर केले जाते आर्थिक सर्वेक्षण, जाणून घ्या त्याचे महत्त्व?

What is Economic Survey : 1 फेब्रुवारी 2022 रोजी केंद्रीय अर्थसंकल्प 2022-23 (Budget 2022) सादर होण्यापूर्वी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेसमोर आर्थिक सर्वेक्षण 2021-22 ) सादर केले.

Published: January 31, 2022 3:07 PM IST

By India.com News Desk | Edited by Chandrakant Jagtap

India 3rd Largest Economy In Purchasing Power: Economic Survey
India 3rd Largest Economy In Purchasing Power: Economic Survey

What is Economic Survey : 1 फेब्रुवारी 2022 रोजी केंद्रीय अर्थसंकल्प 2022-23 (Budget 2022) सादर होण्यापूर्वी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज संसदेसमोर आर्थिक सर्वेक्षण 2021-22 (Economic Survey 2021-22) सादर केले. महत्त्वाचे आर्थिक दस्तऐवज सामान्यत: अर्थसंकल्पाच्या एक दिवस आधी नियमांनुसार संसदेसमोर सादर केले जातात. राष्ट्रपतींनी संसदेच्या दोन्ही सभागृहांना उद्देशून केलेल्या पारंपारिक भाषणानंतर लगेच सर्वेक्षण सादर केले जाते.

आर्थिक सर्वेक्षण म्हणजे काय? (What is Economic Survey)

प्रदीर्घ काळापासून र्थसंकल्पीय अधिवेशनाची परंपरा सुरू आहे. 1950-51 पासून आर्थिक सर्वेक्षण सादर केले जात आहे. 1964 पर्यंत ते अर्थसंकल्पासह सादर केले गेले. मात्र त्यानंतर ते अर्थसंकल्पाच्या एक दिवस आधी सर्वेक्षण सादर करण्याची परंपरा सुरू आहे.

You may like to read

आर्थिक सर्वेक्षण हा अर्थव्यवस्थेच्या रोडमॅपची माहिती देणारा एक महत्त्वाचा अर्थसंकल्पीय दस्तऐवज आहे. आर्थिक सर्वेक्षण सरकारचे प्रमुख विकास कार्यक्रम आणि सरकारच्या धोरणांची स्थिती सामायिक करते आणि गेल्या आर्थिक वर्षातील अर्थव्यवस्थेच्या कामगिरीचे समिक्षण करते. हे सर्वेक्षण मुख्य आर्थिक सल्लागारांद्वारे (CEA) संचालित आर्थिक व्यवहार विभागाच्या (DEA) अर्थशास्त्र विभागाने विकसित केलेले असते.

आर्थिक सर्वेक्षण विविध आर्थिक घटकांमधील स्थितीचे विश्लेषण करते, गुंतवणुकीवर प्रकाश टाकते आणि अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी योजना आणि सुधारणांवर प्रकाश टाकते. हे सर्वेक्षण येत्या वर्षात आर्थिक अंदाज कुठे आणि कसे असेल याच्या डेटासह आर्थिक अंदाज दर्शवते.

आर्थिक सर्वेक्षण कोण तयार करतो?

महत्त्वपूर्ण दस्तऐवज मुख्य आर्थिक सल्लागाराद्वारे (CEA) तयार केला जातो. परंतु यावर्षी तो मुख्य आर्थिक सल्लागार आणि इतर अधिकाऱ्यांनी तयार केला होता कारण कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांचा कार्यकाळ डिसेंबरमध्ये संपल्यानंतर पद रिक्त राहिले होते.

अर्थसंकल्पाच्या एक दिवस आधी आर्थिक सर्वेक्षण का सादर केले जाते?
भारताच्या स्वातंत्र्यानंतर एक दशकाहून अधिक काळ अर्थसंकल्पासह आर्थिक सर्वेक्षण सादर करण्यात आले. 1964 मध्ये दोन्ही वेगळे झाले आणि आर्थिक सर्वेक्षण अगोदरच सादर करण्यात आले. ही प्रथा अजूनही सुरूच आहे. कारण आर्थिक सर्वेक्षण अर्थसंकल्पाचा संदर्भ देते. सर्वेक्षण सादर करणे सरकारला बंधनकारक नाही आणि पहिल्या खंडात सादर केलेल्या शिफारसी सरकारवर बंधनकारक नसतात.

आर्थिक सर्वेक्षणाचे महत्त्व काय?

अर्थसंकल्पापूर्वी सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या आकड्यांपैकी एक आर्थिक सर्वेक्षण पुढील आर्थिक वर्षासाठी सकल देशांतर्गत उत्पादनाचा (GDP) अंदाज असते. त्यात देशाच्या आर्थिक स्थितीची महत्त्वाची माहिती असते.

आर्थिक सर्वेक्षणाची थीम

प्रत्येक आर्थिक सर्वेक्षणाची एक थीम असते. गेल्या वर्षी, थीम होती जीवन आणि उपजीविका वाचवणे. 2017-18 मध्ये आर्थिक सर्वेक्षण गुलाबी होते कारण थीम महिला सक्षमीकरण होती.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 31, 2022 3:07 PM IST