Top Recommended Stories

E-Passport: ई-पासपोर्ट म्हणजे काय? तो कसा काम करतो? येथे जाणून घ्या संपूर्ण माहिती

E-Passport: डिजिटल इंडियाला (Digital India) प्रोत्साहन देण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतरमण (Finance Minister Nirmala sitaraman) यांनी अर्थसंकल्प सादर करीत ई पासपोर्टची (E-Passport) घोषणा केली. लवकरच ही सेवा कार्यान्वित करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

Published: February 2, 2022 5:44 PM IST

By India.com News Desk | Edited by पी.संदीप

नए पासपोर्ट के लिए करें अप्लाई
नए पासपोर्ट के लिए करें अप्लाई

E-Passport: डिजिटल इंडियाला (Digital India) प्रोत्साहन देण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतरमण (Finance Minister Nirmala sitaraman) यांनी अर्थसंकल्प सादर करीत ई पासपोर्टची (E-Passport) घोषणा केली. लवकरच ही सेवा कार्यान्वित करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. सरकार आंतरराष्ट्रीय गाईडलाईन आणि नियमांतर्गत या ई पासपोर्टचे लॉन्चिंग करणार आहे. यामुळे बोगस पासपोर्टला (Bogus Passport) आळा तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर इमिग्रेशन प्रक्रिया देखील सुलभ होईल. मात्र, ई- पासपोर्टबाबत देशातील नागरिकांच्या मनात, ई-पासपोर्ट काय आहे,(What is e-passport) तो कसे काम करतो, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

ई-पासपोर्ट हे नवीन तंत्रज्ञानावर (New Technology) आधारित असेल. सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय मजबूत आणि विश्वासनिय असेल. अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Finance Minister Nirmala sitaraman) यांनी घोषणा केली की, ई पासपोर्टसाठी (E-Passport) सन 2022-23 पासून अर्जं करण्यास सुरुवात होईल. भारतीय नागरिकांचा (Indian People) विदेशातीला प्रवास सोपा व्हावा, या दृष्टीने या ई-पासपोर्टची निर्मिती करण्यात येणार आहे. ई-पासपोर्ट प्रक्रिया झाल्यानंतर ई-पासपोर्टधारक मोजक्या देशाच्या यादीत भारताचा समावेश होईल. सध्या ही सुविधा अमेरिका (America), युरोप (Europe),जर्मनीसह ( Germany) 120 पेक्षा जास्त देशात सुरू आहे.

You may like to read

काय आहे ई-पासपोर्ट?

ई पासपोर्टबाबत बोलायचे झाल्यास ते एक आधुनिक असे पासपोर्ट असेल. ज्यात चीप लागलेली असेल. जे नागरिकांच्या डेटा सेक्युरिटीसाठी ( Data Security) उपयुक्त ठरते. या पासपोर्टमध्ये Radio Frequency identification आणि बायोमॅट्रिक टेक्नॉलॉजीचा (biometric Technology) वापर देखील करण्यात येईल. चिपमुळे विदेश दौर्‍यादरम्यान पासपोर्टला सहज स्कॅन करता येवू शकते. हे पासपोर्ट अधिक सुरक्षित राहते.

असे काम करते ई-पासपोर्ट?

ई पासपोर्टमध्ये ( E Passport) लागलेल्या चिप मुळे स्कॅन करणे सहज सोपे होते. विदेश दौर्‍य दरम्यान शक्यतो लांब लाईनामध्ये उभे राहावे लागते. मात्र, ई पासपोर्ट काही सेकंदात स्कॅन होत इमिग्रेशन सोपे होते. ई पासपोर्टच्या मागे एक सिलिकॉन चीपचा वापर केला गेला आहे. ज्यात 64 kb मेमोरी स्टोअर केली जाऊ शकते. या चीफमध्ये पासपोर्ट होल्डरचा फोटो आणि बायोमेट्रिक डिटेल स्टोअर असेल. ई पासपोर्ट मध्ये प्रवाशांची 30 व्हिजिट स्टोअर केले जाऊ शकतात.

हे आहेत फायदे

– ई-पासपोर्टमुळे बनावट पासपोर्टला आळा बसेल.
– ई-पासपोर्ट फिजिकल पासपोर्टच्या तुलनेत अधिक सुरक्षित असेल.
– ई-पासपोर्टमध्ये प्रवाशांचा बायोमेट्रिक डेटा स्टोअर होईल. अशात पासपोर्ट हरविल्यास कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही.
– सर्वात खास गोष्ट म्हणजे ई-पासपोर्ट आल्यानंतर पडताळणी प्रक्रिया सुलभ होत वेळेची बचत होईल.
– यासह इमिग्रेशन प्रक्रिया सुलभ हण्यास मदत होईल.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.