काबूल: अफगाणिस्तानत तालिबानने सरकार स्थापनेची तयारी सुरू केली आहे. यासाठी जबाबदाऱ्या देखील वाटून देण्यात आल्या आहेत. तालिबानच्या नव्या सरकारचे नेतृत्व मुल्ला हसन अखुंद (Mohammad Hasan Akhund) यांच्या हाती असणार आहे. तर तालिबानचे सहसंस्थापक अब्दुल गनी बरदार हे अफगाणिस्तानचे उपनेते असतील. एएनआय या वृत्तसंस्थेने एएफपीच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.Also Read - Taliban Government in Afghanistan: अफगाणिस्तानात तालिबानचे नवीन सरकार गठीत, मोहम्मद हसन यांच्याकडे पंतप्रधानपद

मुल्ला हसन सध्या तालिबानची निर्णय घेणारी शक्तिशाली संस्था ‘रहबारी शूरा’ या लीडरशिप कौन्सिलचे प्रमुख आहेत. ते प्रमुख नेत्याच्या अनुमोदानावरून संघटनेच्या सर्व प्रकरणांवर सरकारी मंत्रिमंडळाप्रमाणे काम करतात. दरम्यान, या संघटनेचे प्रमुख मुल्ला हेबतुल्लाह अखुंदजादा यांना अफगाणिस्तानचे नवीन प्रमुख म्हणून नामांकित करण्यात आले आहे. Also Read - Taliban Video: तालिबानचा क्रूर चेहरा! आधी फाशी दिली, नंतर हेलिकॉप्टरला लटकवून शहरभर फिरवला मृतदेह

मुल्ला हसन हा तालिबानची सुरुवातीची जागा कंदहार येथील आहे आणि तो सशस्त्र चळवळीचा संस्थापकांपैकी एक आहे. मुल्ला हसन यांनी ‘रहबरी शुरा’चे प्रमुख म्हणून 20 वर्षे काम केले आहे. मुल्ला हसन हे मुल्ला हेबतुल्ला यांच्या जवळचे मानले जाते. 1996 ते 2001 पर्यंत अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारच्या काळात त्यांनी परराष्ट्र मंत्री आणि उपपंतप्रधान म्हणून काम केले होते.

मीडिया रिपोर्टनुसार तालिबानचे संस्थापक मुल्ला मोहम्मद उमर यांचे पुत्र मुल्ला याकूब हे नवे संरक्षण मंत्री असतील. याकूब हा मुल्ला हेबतुल्लाचा विद्यार्थी होता ज्याने तालिबानच्या शक्तिशाली लष्करी आयोगाचे प्रमुख म्हणून नियुक्त केले होते. तालिबानच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हक्कानी नेटवर्कचे प्रमुख आणि सोव्हिएतविरोधी क्षत्रप जलालुद्दीन हक्कानी यांचे पुत्र सिराजुद्दीन हक्कानी यांना गृहमंत्रिपदाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. तर मुल्ला अमीर खान मुत्ताकी हे नवे परराष्ट्र मंत्री असतील.

सिराजुद्दीन हक्कानीचे नाव जागतिक स्तरावरील दहशतवाद्यांच्या यादीत आहे. त्याच्याबद्दलच्या माहितीवर अमेरिकेने 5 दशलक्ष डॉलरचे बक्षीस जाहीर केले आहे. अमेरिकन फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनच्या (एफबीआय) वेबसाइटनुसार 2008 मध्ये अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष हमीद करझाई यांच्या हत्येच्या कटात तो सहभागी होता.