OMG! आली जगातील पहिली रंग बदलणारी कार, बटण दाबताच व्हाईट कार होईल ब्लॅक

जर्मनीची कार निर्माता कंपनी बीएमडब्ल्यूने जगातील पहिली रंग बदलणारी कार रस्त्यावर उतरवली आहे.

Published: January 7, 2022 8:05 PM IST

By India.com News Desk | Edited by पी.संदीप

OMG! आली जगातील पहिली रंग बदलणारी कार, बटण दाबताच व्हाईट कार होईल ब्लॅक

Colour Changing Car: जर्मनीची कार निर्माता कंपनी बीएमडब्ल्यूने (BMW) जगातील पहिली रंग बदलणारी कार (Colour Changing Car) रस्त्यावर उतरवली आहे. लॉस वेगासमध्ये सुरू असलेल्या कंझ्युमर इलेक्ट्रिक शोमध्ये (CES) BMW ने सादर केली आहे. BMW iX Flow नामक या कारमध्ये इलेक्ट्रॉनिक इंक टेक्नोलॉजीचा वापर करण्यात आला आहे. तसे पाहिले तर या तंत्रज्ञानाचा वापर ई-रीडर्समध्ये केला जातो. विशेष म्हणजे बटण दाबताच राखाडी आणि पांढऱ्या रंगात कारचे बाह्य भाग देखील बदलू शकतात.

Also Read:

नेमकी काय आहे ही टेक्नोलॉजी?

बीएमडब्ल्यू रिसर्च इंजिनियर स्टेला क्लार्क म्हणाले, कारमध्ये ई इंक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे कारचा रंग बदलता येतो. आम्ही यात वापरलेले मटेरियल हे पातळ कागदासारखे आहे. कारसारख्या 3 डी ऑब्जेक्टवर या मटेरियलचा वापर करणे आमच्यासाठी आव्हानात्मक होते. कारच्या बॉडीला ई-इंक कोटिंग देण्यात आले आहे. त्यात पांढर्‍या रंगाचे निगेटिव्ह चार्ज आणि काळ्या रंगाचे पॉझिटिव्ह चार्ज केलेले पिगमेंट आहे. फोन अॅपद्वारे या पिगमेंट्सला सिग्नल पाठवला जातो तेव्हा सरफेसचा रंग बदलतो.

क्लार्क म्हणाले, या तंत्रज्ञानाचा वापर सनलाइट रिफ्लेक्शनसाठी देखील करता येईल. उन्हाळात तुम्ही सूर्यप्रकाश परावर्तित करण्यासाठी कारचा रंग व्हाईट करू शकतात. तर थंडीच्या दिवसात उष्णता शोषून घेण्यासाठी ब्लॅक रंगात करू शकता. भविष्यात कारचा रंग बदलण्यासाठी डॅशबोर्डवर एक बटण दिले जाईल. सोबतच हातांच्या हालचालीवर देखील ते कंट्रोल करता येईल.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 7, 2022 8:05 PM IST