मुंबई: चायनाची स्मार्टफोन निर्माता कंपनी Xiaomi नं ग्लोबल मार्केटमध्ये एकाच वेळी 3 नवे स्मार्टफोन लॉन्च करून आपला दबदबा निर्माण केला आहे. यात प्रीमियम स्मार्टफोन Xiaomi 11T आणि 11T Pro चा समावेश आहे. विशेष म्हणजे कंपनीनं आपला स्वस्त 5G स्मार्टफोन Xiaomi 11 Lite 5G NE लॉन्च केला आहे. हा फोन शानदार फीचर्सनं अद्ययावत आहे. या स्मार्टफोनमध्ये यूजर्सला पॉवरफूल बॅटरी आणि दमदार कॅमेरासह खास फीचर्सची सुविधा मिळेल.Also Read - Aadhaar Update: आता घरबसल्या करू शकता 'आधार'मध्ये हे महत्वाचे बदल; UIDAI ने ट्वीट करून दिली महत्त्वाची माहिती

Xiaomi 11 Lite 5G NE: किंमत

Xiaomi 11 Lite 5G NE हा स्मार्टफोन तीन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. यात 6GB + 128GB स्टोरेज मॉडलची किंमत जवळपास 30,300 रुपये आहे. 8GB + 128GB मॉडलची किंमत 34,600 रुपये आहे. मात्र, कंपनीनं 8GB + 256GB स्टोरेज मॉडलची किंमत किती आहे, याबाबत अद्याप खुलासा केलेला नाही. स्मार्टफोन Bubblegum Blue, Peach Pink, Snowflake White आणि Truffle Black कलर व्हेरिएंटमध्ये उपलब्ध होईल.
Also Read - IPL 2021 RCB vs KKR: विराट कोहलीचं स्वप्न भंगलं! रोमांचक लढतीत कोलकाताचा दणदणीत विजय

Xiaomi 11 Lite 5G NE: स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

Xiaomi 11 Lite 5G NE स्मार्टफोनमध्ये ड्यूल सिम सपोर्ट दिला आहे. अँड्राइड 11 ओएसला हा फोन सपोर्ट करतो. यात 1080×2400 पिक्सलच्या स्क्रीन रेझोल्यूशनसोबत 6.55 इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. विशेष म्हणजे डिस्प्लेमध्ये डॉल्बी व्हिजन सपोर्ट देण्यात आला आहे. Also Read - Samsung Galaxy M52 5G स्मार्टफोन झाला लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!

octa-core Qualcomm Snapdragon 778G प्रोसेसरवर स्मार्टफोनची काम चालतं. यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये मेन सेंसर 64MP चा आहे. 8MP चा अल्ट्रा वाइड शूटर आणि 5MP चा टेलिमायक्रो शूटर देण्यात आला आहे. सेल्फीसाठी यूजर्सला या स्मार्टफोनमध्ये 20MP चा फ्रंट कॅमेरा मिळेल. पॉवर बॅकअपसाठी 4250mAh ची बॅटरी दिली असून ती 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट करते.

कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi 6, ब्लूटूथ 5.2, जीपीएस, एनएफसी, आयआर ब्लास्टर आणि यूएसबी टाइप सी पोर्ट सारखे फीचर्स दिले आहे.