Xiaomi 11 Lite NE 5G वर मिळतोय 5500 रुपयांचा डिस्काऊंट, जाणून घ्या काय आहे ऑफर

देशातील हा पहिला फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेला स्मार्टफोन आहे. स्मार्टफोनची बॅटरी 100 टक्के चार्ज करण्यासाठी केवळ 15 मिनिटांचा कालावधी लागतो.

Published: January 6, 2022 5:48 PM IST

By India.com News Desk | Edited by पी.संदीप

Xiaomi 11i hyperchange
Xiaomi 11i HyperCharge 5G is claimed to charge from zero to 100 in 15 minutes (Photo: Xiaomi India)

Xiaomi ने आज भारतीय बाजारात आपला मोस्ट अवेटेड स्मार्टफोन Xiaomi 11i HyperCharge लॉन्च केला. देशातील हा पहिला फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेला स्मार्टफोन आहे. स्मार्टफोनची बॅटरी 100 टक्के चार्ज करण्यासाठी केवळ 15 मिनिटांचा कालावधी लागतो. (Xiaomi 11 Lite NE 5G Discount) स्मार्टफोनमध्ये अनेक शानदार फीचर्स​ देखील देण्यात आले आहेत. अशातच कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. कंपनीने स्मार्टफोन Xiaomi 11 Lite NE 5G वर मोठा डिस्काऊंट दिला आहे. आता ग्राहकांना हा स्मार्टफोन कमी किमतीत उपलब्ध होणार आहे.

Also Read:

Xiaomi 11 Lite NE 5G स्मार्टफोन Xiaomi Flagship Days Sale मध्ये किमतीत आणि आकर्षक ऑफर्ससह विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

Xiaomi Flagship Days Sale: घ्या आकर्षक ऑफरचा लाभ…

Xiaomi Flagship Days Sale 4 जानेवारीला सुरू झाला असून पुढील 10 जानेवारीपर्यंत सुरू राहाणार आहे. या सेलमध्ये तुम्ही Xiaomi 11 Lite NE 5G स्मार्टफोन केवळ 21,499 रुपये किमतीत खरेदी करू शकतात. कंपनीचा हा मिड प्रीमियम कॅटेगरीतील स्मार्टफोन आहे. 6GB + 128GB मॉडेलची किंमत 26,999 रुपये आहे तर 8GB + 128GB मॉडेलची किंमत 28,999 रुपये आहे. सेलमध्ये या दोन्ही मॉडेल्सवर 5,500 रुपयांचा डिस्काऊंट मिळत आहे.

तुम्ही जर हा स्मार्टफोन प्रीपेडच्या माध्यमातून खरेदी करणार असाल तर तुम्हाला 2000 रुपयांचा डिस्काऊंट मिळेल. यासाठी तुम्हाला ऑनलाईन ट्रान्झेक्सन मोडवरून पेमेंट करावे लागेल. याशिवाय या स्मार्टफोनवर 3000 रुपयांची एक्सचेंज ऑफर देखील आहे. इतकेच नाही तर ग्राहक 500 रुपयांचा Mi Reward मिळवू शकतात. याचा अर्थ असा की, ग्राहकांना एकूण 5,500 रुपयांचा डिस्काऊंट मिळेल.

Xiaomi 11 Lite NE 5G: स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

Xiaomi 11 Lite NE 5G स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 778G प्रोसेसरवर काम करतो. स्मार्टफोनमध्ये 64MP चा ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. तसेच सेल्फीसाठी यूजर्सला 20MP चा फ्रंट कॅमेरा मिळेल. स्मार्टफोनसोबत 6.55 इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले आहे. पावर बॅकअपसाठी यूजर्सला 4250mAh बॅटरी देण्यात आली आहे. सिंगल चार्जमध्ये लॉंग बॅकअप मिळेल.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 6, 2022 5:48 PM IST