Xiaomi आज (10 ऑगस्ट) ग्लोबल मार्केटमध्ये आपला अवेटेड डिव्हाइस Mi MIX 4 लॉन्च करणार आहे. परंतु लॉंचिंगच्या आधीच या स्मार्टफोनची किंमत आणि फीचर्स लीक झाले आहेत. या स्मार्टफोनमध्ये दमदार प्रोसेसरसोबत इन-डिस्प्ले कॅमेरा सेटअप आणि पॉवरफूल बॅटरीसारखे फीचर्स देण्यात आले आहेत. Mi MIX 4 सोबतच कंपनी आज आपले इतर प्रॉडक्ट्स लॉन्च करणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यात Mi Pad 5 आणि Mi OLED TV 2021 चा समावेश आहे.Also Read - Xiaomi 11 Lite 5G NE: लॉन्च झाला स्वस्त 5G स्मार्टफोन, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Mi MIX 4: असं पाहू शकतात लाइव्ह स्ट्रीम

Mi MIX 4 हा स्मार्टफोन आज ग्लोबल मार्केटमध्ये लॉन्च करण्यात येईल. Xiaomiचा लाँचिंग इव्हेंट भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजून 30 मिनिटांला सुरू होईल. या इव्हेंट लाईव्ह स्ट्रीमिंग कंपनीच्या अधिकृत फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनलवर पाहाता येईल. Also Read - JioBook Laptop: 4G स्मार्टफोननंतर आता Jio लॉन्च करणार स्वस्त लॅपटॉप!

Mi MIX 4: संभाव्य किंमत

Mi MIX 4 या स्मार्टफोनबाबत बहुतांश माहिती लॉंचिंग आधी समोर आली आहे. कंपनीनं अद्याप या फोनच्या किंमतीबाबत खुलासा केलेला नाही. परंतु, ‘आय लीक्स’नुसार, Mi MIX 4 ची किंमत 60,000 रुपये ते 70,000 रुपयांदरम्यान असू शकते. Also Read - Realme च्या लेटेस्ट 5G स्मार्टफोनवर मिळतोय 6,000 रुपयांचा डिस्काउंट, तुम्हीही घेऊ शकतात लाभ

Mi MIX 4: संभाव्य स्पेसिफिकेशन्स

‘आय लीक्स’नुसार, Mi MIX 4 मध्ये 6.67 इंचाचा ओएलईडी स्क्रीन असू शकतो. जो की 120Hz रिफ्रेश रेटसोबत येईल. स्मार्टफोनमध्ये लेटेस्ट Snapdragon 888+ प्रोसेसर असण्याची शक्यता आहे. तर फोनमध्ये अँड्राइड 11 बेस्ड MIUI 12.5 कस्टम स्किल असू शकतं. 120W फास्ट चार्जिंग सपोर्टसोबत 5000mAh ची बॅटरी असू शकते. कनेक्टिव्हिटीसाठी वायफाय, जीपीएस, ब्लूटूथ आणि यूएसबी टाइप सी पोर्ट सारखे फीचर्स उपलब्ध होऊ शकतात.

Mi Pad 5: संभाव्य स्पेसिफिकेशन्स

Xiaomi नं नुकतेच आपल्या अपकमिंग टॅबलेट Mi Pad 5 च्या डिझाइनच टीझर प्रसिद्ध केलं होतं. यात पिल शेप्ड कॅमेरा मॉड्यूलसोबत ड्युअल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. यासोबतच यूजर्ससा अटॅच कीबोर्ड मिळेल. या शिवाय ​डिव्हाइसमध्ये एडिशनल स्टायलस देखील पाहायला मिलेल.