मुंबई: तुम्ही बजेट रेंजमध्ये एक दमदार स्मार्टफोन खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी ही माहिती महत्त्वाची आहे. Redmi Note 10 Pro Max ही स्मार्टफोन तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो. या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला जबरदस्त प्रोसेसर, 108 MPचा कॅमेरा आणि पावरफुल बॅटरीसह अनेक शानदार फीचर्स मिळतील. तसं पाहिलं तर Redmi Note 10 Pro Max हा बजेट रेंज स्मार्टफोन नाही आहे. परंतु काही ऑफर्सचा लाभ घेतल्यास स्वस्त दरात तुम्ही हा स्मार्टफोन खरेदी करू शकतात.Also Read - Xiaomi 11 Lite 5G NE: लॉन्च झाला स्वस्त 5G स्मार्टफोन, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Xiaomiनं आपल्या अधिकृत वेबसाईटवर या स्मार्टफोनबाबत माहिती दिली आहे. चला तर मग जाणून घेऊया Redmi Note 10 Pro Max बाबत लेटेस्ट अपडेट्स…
Also Read - JioBook Laptop: 4G स्मार्टफोननंतर आता Jio लॉन्च करणार स्वस्त लॅपटॉप!

Redmi Note 10 Pro Max स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी तुम्ही HDFC बॅंकेचं डेबिट किंवा क्रेडीट कार्ड वापरू शकतात. त्यावर तुम्हाला 1,500 रुपयांचा डिस्काउंट मिळेल. हा स्मार्टफोन केवळ 18,499 रुपयांत उपलब्ध आहे. विशेष म्हणजे स्मार्टफोनला नो कोस्ट इएमआयवर देखील तुम्ही खरेदी करू शकतात. Redmi Note 10 Pro Max स्मार्टफोन 6GB + 64GB, 6GB + 128GB आणि 8GB + 128GB या तीन स्टोरेज मॉडलमध्ये उपलब्ध आहे.
Also Read - Realme च्या लेटेस्ट 5G स्मार्टफोनवर मिळतोय 6,000 रुपयांचा डिस्काउंट, तुम्हीही घेऊ शकतात लाभ

Redmi Note 10 Pro Max के फीचर्स

– 120Hz रिफ्रेश रेटसह 6.67 इंच की फुल एचडी+ ​सुपर एमोलेड डिस्प्ले
– Qualcomm Snapdragon 732G प्रोसेसर
– Android 11 ऑपरेटिंग सिस्टम
– सर्वात जबरदस्त फीचर्स म्हणजे शानदार कॅमेरा सेटअपनं अद्ययावत
– 108MP चा प्रायमरी सेंसर, फोटोग्राफीचा शानदार एक्सपीरियन्स
– 8MP चा अल्ट्रा वाइड अँगल लेंस, 5MP चा टेली मायक्रो आणि 2MP चा डेप्थ सेंसर
– व्हिडीओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी फोनमध्ये 16MPचा फ्रंट कॅमेरा
– पावर बॅकअपसाठी 5,020mAh ची दमदार बॅटरी सोबतच 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट