Top Recommended Stories

Yamaha ने लॉन्च केली नवीन रेट्रो स्कूटर, जाणून घ्या Yamaha Fazzio ची किंमत आणि फीचर्स!

Yamaha Fazzio Scooter : Yamaha कंपनीने नवीन रेट्रो स्कूटर Yamaha Fazzio लाँच केली आहे. ही स्कूटर खूपच आकर्षक आहे. महत्वाचे म्हणजे डिझाईनच्या बाबतीत ही स्कूटर अतिशय आकर्षक आहे.

Published: July 31, 2022 1:22 PM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

यमाहाची नवीन रेट्रो स्कूटर लॉन्च
यमाहाची नवीन रेट्रो स्कूटर लॉन्च

Yamaha Fazzio Scooter : Yamaha कंपनीने आपल्या पोर्टफोलिओचा विस्तार करत नवीन रेट्रो स्कूटर लॉन्च केली आहे. ही 125cc स्कूटर आहे ज्याचे नाव Yamaha Fazzio आहे. या स्कूटरमधील अनेक फीचर्स भारतीय बाजारात मिळणाऱ्या Fascino 125 सारखे आहेत. सध्या ही स्कूटर थायलंडच्या मार्केटमध्ये विकली जात असून तेथे ती स्कूटर लॉन्च करण्यात आली आहे. या स्कूटरचे डिझाईन अतिशय आकर्षक असून याला पांढरा आणि केशरी रंगाचे कॉम्बिनेशन देण्यात आले आहे. यामध्ये स्मार्टफोनसारखी दिसणारी उभी स्क्रीन फिक्स करण्यात आली आहे.

Also Read:

दुचाकीचे उत्पादक करण्यात आघाडीवर असणाऱ्या Yamaha कंपनी ग्राहकांसाठी प्रत्येक वेळी नवनवीन स्कूटर्स मार्केटमध्ये आणत असते. आता या कंपनीने नवीन रेट्रो स्कूटर Yamaha Fazzio लाँच केली आहे. ही स्कूटर खूपच आकर्षक आहे. महत्वाचे म्हणजे डिझाईनच्या बाबतीत ही स्कूटर अतिशय आकर्षक आहे. आजच्या या लेखाच्या माध्यमातून आपण Yamaha Fazzio या स्कूरची किंमत आणि त्याच्या वैशिष्ट्यांबद्दल जाणून घेणार आहोत….

You may like to read

फॅजिओ स्कूटर लूकच्या बाबतीत ही स्कूटर खूपच आकर्षक आहे. स्कूटरला रेट्रो लुक देण्यासाठी गोल एलईडी हेडलाइटचा वापर करण्यात आला आहे. Fazio मध्ये 125 cc सिंगल-सिलेंडर आहे, जो 8.4bhp पॉवर आणि 10.6Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. Yamaha च्या इतर स्कूटर Fascino 125 मध्ये सापडलेली मोटर 8.04bhp पॉवर आणि 10.3Nm टॉर्क जनरेट करते. इंजिन आउटपुटच्या दृष्टिकोनातून Fazzio खूपच चांगले आहे.

Fazio ला LED हेडलाइट, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह संपूर्ण डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, USB स्लॉट आणि स्कूटर चावीशिवाय चालवता येते. यात टेलीस्कोपिक फ्रंट फोर्क्स आणि मागील बाजूस मोनोशॉक आहे. ब्रेकिंगसाठी या स्कूटरमध्ये फ्रंट डिस्क आणि रियर ड्रम ब्रेक वापरण्यात आले आहेत. इंधन टाकीबद्दल सांगायचे झाल्यास या स्कूटरमध्ये 5.1- लीटरची इंधन टाकी आहे.

थायलंडमध्ये Yamaha Fazio ची किंमत TBH 54,900 पासून सुरू होते म्हणजेच बेस व्हेरियंटसाठी सुमारे 1.20 लाख रुपये मोजावे लागणार आहेत. स्मार्ट ट्रिमची किंमत TBH 56,600 म्हणजेच सुमारे 1.23 लाख रुपये आहे. Yamaha कंपनीने ही स्कूटर भारतात लाँच करणार की याबद्दल अद्याप काहीच माहिती दिली नाही.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या